
सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची लक्षणे
चुकीची जीवनशैली, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेला पोषक घटकांचा अभाव, जंक फूडचे सेवन,शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.कोरोना महामारीनंतर सगळ्याच गोष्टी डिजिटली झाल्या आहेत. मात्र या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. हल्ली मधुमेह, कोलेस्ट्रॉल अय आजारांसोबत प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस. सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा गंभीर आजार आहे. यामुळे पाठीच्या कण्याला आणि मणक्याला सूज येण्याची शक्यता असते. शरीरात सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची लक्षणे दिसू लागल्यास त्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात.(फोटो सौजन्य – iStock)
गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या मासिक पाळीचा आरोग्यावर होणारा परिणाम
शरीरात निर्माण झालेला शारीरिक हालचालींचा अभाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची समस्या उद्भवते. ही समस्या उद्भवू लागल्यानंतर पाठीच्या वरच्या कण्याला, मणका आणि मानेला सूज येते. सर्व्हायकल स्पाईनमध्ये समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. बैठी जीवनशैली, चुकीच्या पद्धतीने बसणे, चुकीच्या पद्धतीने झोपणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे सर्व्हायकल स्पाईनमध्ये वेदना होण्याची शक्यता असते.
सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. इलेक्ट्रोमायोग्राफी, एक्स-रे, एमआरआय इत्यादी तपासण्यांमधून सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसचे निदान केले जाते. ही समस्या उद्भवल्यानंतर नियमित व्यायाम, मुद्रा, योगासने आणि शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे पाठ आणि मानेवरील तणाव कमी होईल. याशिवाय शरीराच्या वाढलेल्या वजनामुळे देखील सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवावे. मान किंवा पाठीमध्ये जास्त वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर गरम किंवा थंड पाण्याचा शेक घ्यावा. यामुळे वेदना आणि जळजळ कमी होईल.