वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा शरीरात तणाव वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला मानसिक आणि शारीरिक तणाव काहीवेळा आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अनेकदा शरीरात थकवा किंवा अशक्तपणा वाढू लागल्यानंतर डोके दुखीची समस्या उद्भवू लागते किंवा सकाळी उशिरा उठल्यानंतर काहीवेळा अनेकांना डोके दुखीची समस्या उद्भवू लागते. याशिवाय इतरही कोणत्याही कारणांमुळे डोकं दुखू लागते. मात्र बरेच जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावे.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात सतत थकवा जाणवतो? विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
मायग्रेन, ऍसिडिटी, तणाव किंवा इतर कारणांमुळे डोकं दुखीची समस्या उद्भवू लागते. काहींना वारंवार डोके दुखीचा त्रास जाणवू लागतो. मात्र या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोके दुखीचा त्रास वाढू लागल्यानंतर कोणत्या आजारांचा धोका वाढतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे सतत डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर वेळीच उपचार करावे.
निद्रानाशाची समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. झोपेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर निद्रानाशाची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे नियमित 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. शांत झोप घेतल्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. मन शांत ठेवण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित ८ तासांची शांत झोप घ्यावी.
शरीरात वाढलेला तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. त्यामुळे योग्य वेळी शांत झोप घेणे आवश्यक आहे. वारंवार डोकं दुखीचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. अधिक काळ उपाशी राहिल्यामुळे सुद्धा डोकं दुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला मानसिक आणि शारीरिक तणाव डोके दुखीचे प्रमुख कारण आहे.
सायनसची समस्या उद्भवू तीव्र डोकेदुखी आणि नाकाचे वाढलेले हाडं दुखू लागते. नाकाचे हाडं वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय एखाद्या व्यक्तीला वारंवार डोके दुखीचा त्रास उद्भवू लागल्यास क्रॉनिक सायनुसायटिस किंवा सायनस इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. डोकं दुखणे हे सायनसचे प्रमुख लक्षण आहे.
शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे पाहिलं लक्षण म्हणजे डोकं दुखणे आणि चक्कर येणे. शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.