'या' समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही करू नका ऊसाच्या रसाचे सेवन:
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उसाच्या रस पिण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. यामध्ये आढळून येणारे घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. उसामध्ये कायबोहाइड्रेट, प्रोटिन, पोटॅशिअम, मिनरल्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. उसाचा रस प्यायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय पोषक तत्वे देखील मिळतात. मात्र नैसर्गिक गोडवा असलेला उसाचा रस या लोकांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. दैनंदिन आहारात अतिप्रमाणत उसाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. एक ग्लास उसाच्या रसात 250 कॅलरी आणि 100 ग्रॅम शुगर असते, ज्यामुळे झपाट्याने वजन वाढते. उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी उसाच्या रसाचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
दैनंदिन आहारात चुकूनही करू नका ‘या’ फळांचे सेवन! पोटावर वाढलेला चरबीचा घेर होईल कमी, वजनात होईल घट
जगभरातील लाखो लोक मधुमेहसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. रक्तात वाढलेली साखर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. त्यामुळे ऊसाच्या रसाचे सेवन मधुमेह असलेल्या लोकांनी करू नये. उसाच्या रसामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते तर ग्लायसेमिक लोड जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे उसाचा रस प्यायल्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते. जे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. मधुमेह झाल्यानंतर अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यास हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि शरीराच्या रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होतात.
दातांची समस्या असलेल्या लोकांनी ऊसाचा रस पिणे टाळावे. उसाच्या रसाचे सेवन केल्यामुळे हिरड्यांमधील वेदना वाढून दात खराब होणे, दातांमधून रक्त येते, हिरड्यांना सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उसाच्या रसाचे सेवन करू नये. दातांमध्ये निर्माण झालेल्या पोकळीमुळे दातांचे नुकसान होते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी साखरेचे सेवन करावे.
‘वजन कमी करायला जाल, माघारी कॅन्सर घेऊन याल…’ Weight Lossसाठी ‘हा’ डाईट मुळीच करू नका
उसाच्या रसामध्ये जास्त कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे वाढलेल्या वजनाने त्रस्त असलेल्या लोकांनी उसाच्या रसाचे सेवन करू नये. शरीराला जास्त कॅलरीज मिळाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. अतिप्रमाणात उसाचा रस प्याल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. पोट खराब होण्यासोबतच उलटी, मळमळ किंवा चक्कर येण्याचा धोका वाढू शकतो.