दैनंदिन आहारात चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन
बदलते वातावरण, सतत आहारात होणारा बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर होण्याची शक्यता असते. यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. वाढलेल्या वजनाने जगभरात अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. पोट आणि शरीराच्या इतर भागांवर वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी अनेक महिला प्रोटीनशेक किंवा इतर वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र वजन कमी करण्यासाठी गोळ्या औषध खाणे अतिशय चुकीचे आहे.(फोटो सौजन्य – iStock)
चवीला आंबट पण आरोग्यासाठी गोड ! एक लिंबू खाल्ल्यास मिळेल ‘हे’ 5 अनोखे फायदे
वजन वाढल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन वाढल्यानंतर योग्य डाईट फॉलो करून वाढलेले वजन कमी करावे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी आहारात फळांचे सेवन करतात. मात्र फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना कोणत्या फळांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
चवीला गोड असलेला आंबा सगळ्यांचं खूप आवडतो. मात्र आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. अतिप्रमाणात आंब्याचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण आणखीनच वाढण्याची शक्यता असते. या फळामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. पण वजन कमी करताना आंब्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
आकाराने लहान असलेली द्राक्ष रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवतात. यामध्ये असलेली नैसर्गिक साखर रक्तामध्ये लगेच मिक्स होते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. वजन कमी करताना सतत द्राक्षांचे सेवन केल्यास वजन कमी होण्याऐवजी वजन आणखीनच वाढू लागते. त्यामुळे फायबरयुक्त फळांचे सेवन करताना सफरचंद किंवा ब्लूबेरीचे सेवन करावे.
विटामिन सी युक्त चेरीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेले घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. चेरी खाल्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते. त्यामुळे वजन कमी करताना चेरी खाण्याऐवजी स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा रास्पबेरी इत्यादी कमी कॅलरीज युक्त फळांचे सेवन करावे.
Papaya Leaves: एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत पपईची पाने, खाण्याने मिळतील अफलातून फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिची हे फळ उपलब्ध असते. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. पण यामध्ये असलेला गोडवा रक्तातील साखर झपाट्याने वाढवतो. वाढलेले वजन कमी करताना लिचीची सेवन जास्त प्रमाणात करू नये. त्यामुळे आहारात लिचीच्या ऐवजी सफरचंद, पेर किंवा पेरू खाऊ शकता.