Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haircare Tips : घामामुळे केस चिकट होतात? जाणून घ्या स्कॅल्प हेल्दी ठेवण्याचे सोपे उपाय

Summer Care Tips : उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे आपल्या केसांचे आरोग्य खराब होऊ लागते. यामुळे केस तेलकट, चिकट होऊ लागतात शिवाय मुळांपर्यंत घाम पसरल्याने याचा आपल्या टाळूवरही परिणाम होऊ लागतो. चला उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2026 | 10:29 AM
Haircare Tips : घामामुळे केस चिकट होतात? जाणून घ्या स्कॅल्प हेल्दी ठेवण्याचे सोपे उपाय

Haircare Tips : घामामुळे केस चिकट होतात? जाणून घ्या स्कॅल्प हेल्दी ठेवण्याचे सोपे उपाय

Follow Us
Follow Us:
  • उष्णतेमुळे केसांमध्ये वाढणारा तेलकटपणा आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी काही सवयी बदलणं गरजेचं आहे.
  • टाळू सतत ओलसर राहिल्यास अनेक त्रास सुरू होऊ शकतात; त्यामुळे स्वच्छता आणि योग्य काळजी महत्त्वाची ठरते.
  • उन्हाळ्यात हलके हेअर प्रॉडक्ट्स, योग्य हायड्रेशन आणि नैसर्गिक उपाय केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात उष्णता भरपूर वाढते ज्यामुळे घामाचा त्रास जाणवू लागतो. या घामामुळे फक्त त्वचेचे नाही तर केसांचेही नुकसान होत असते. सततच्या या घामामुळे केसांमध्ये ओलावा निर्माण होतो ज्यामुळे आपली केस चिकट होऊ लागतात. केसांमध्ये तेलकटपणा जाणवू लागतो. यामुळे दिवसातून दोनदा आंघोळ करावीशी वाटते. इतकंच नाही तर या घामाचा आपल्या टाळूवरही परिणाम होत असतो. केसांच्या मुळांमध्ये घाम साचल्याने अनेक समस्या निर्माण होतात ज्यामुळे याकाळात केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. योग्य प्रकारे आपल्या स्कॅल्पची काळजी राखल्यास तुम्ही केसांना निरोगी ठेवू शकता आणि डॅमेजपासून त्यांचे संरक्षण करु शकता.

India’s Mini Israiel: कमी बजेटमध्ये विदेश यात्रा करायचीये? मग भारतातील या ठिकाणाला भेट द्या

टाळूवर खाज आणि कोंडा का होतो ?

घामामुळे स्कॅल्प तसाच ओलसर राहतो. आणि वेळेवर डोकं स्वच्छ नाही केलं, तर हा ओलसरपणा बुरशीला कारणीभूत ठरते. त्यामुळे कोंडा, कोरड्या त्वचेसारखे खवले निघणं आणि सतत खाज येण्याची समस्या निर्माण होते.

तेलकटपणा आणि दुर्गंधीची समस्या

जास्त घाम आला आणि तो टाळूतील नैसर्गिक तेलात मिसळला की केस लगेचच चिकट आणि तेलकट दिसायला लागतात. टाळूही जड वाटू लागते आणि कधी कधी वासही येतो. त्यामुळे केस फ्रेश आणि स्वच्छ दिसत नाहीत.

केस गळण्याची शक्यता

टाळूवर सतत घाम आणि घाण राहिली तर केसांच्या मुळांना त्रास होतो. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि जास्त गळू लागतात. म्हणून टाळू स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे.

हायड्रेशन आणि आहार महत्त्वाचा

पुरेसं पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. यामुळे केस आणि टाळू आतून निरोगी राहतात. जास्त प्रॉडक्ट्स टाळा: जेल, स्प्रे किंवा जड स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरल्यास घाम आणि धूळ केसांमध्ये अडकते. त्यामुळे शक्यतो हलके प्रॉडक्ट्स वापरा.

नियमित स्वच्छता ठेवा

आठवड्यातून २-३ वेळा सौम्य शाम्पूने केस धुवा. घाम आल्यानंतर केस कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. हवेची देवाणघेवाण होईल अशी हेअरस्टाईल ठेवा. घट्ट हेअरस्टाईल्सऐवजी सैल वेणी, पोनीटेल किंवा बन ठेवल्यास टाळूला हवा मिळते.

Skin Care Tips: डोळ्यांखाली वाढलेल्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग नियमित प्या ‘हे’ गुणकारी पेय

नैसर्गिक घटकांचा वापर करा

कोरफड, कडुलिंब किंवा टी ट्री ऑइलयुक्त उत्पादनं टाळू स्वच्छ ठेवायला आणि जळजळ कमी करायला मदत करतात.

ओला टाळू ठेवू नका

घाम आल्यानंतर किंवा केस धुतल्यानंतर टाळू जास्त वेळ ओला ठेवू नका.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Summer hair care tips for sweaty scalp oily hair and dandruff problems lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • hair care tips
  • lifestyle news
  • summer care tips

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
2

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
4

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.