Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : आंब्याचा सीजन अन् तुम्ही मँगो मस्तानी खाल्ली नाही तर काय केलं? 100 वर्षे जुना आहे हा पदार्थ

Mango Mastani Recipe : उन्हाळ्यातील एकमेव आनंद म्हणजे आंबा... यापासून अनेक पदार्थ बनवले जातात आणि यातीलच एक म्हणजे मँगो मस्तानी! हे पुणे शहरातील एक लोकप्रिय पेय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 03:30 PM
Summer Special : आंब्याचा सीजन अन् तुम्ही मँगो मस्तानी खाल्ली नाही तर काय केलं? 100 वर्षे जुना आहे हा पदार्थ

Summer Special : आंब्याचा सीजन अन् तुम्ही मँगो मस्तानी खाल्ली नाही तर काय केलं? 100 वर्षे जुना आहे हा पदार्थ

Follow Us
Follow Us:
  • मँगो मस्तानी हा पदार्थ खास करुन पुण्यात फार लोकप्रिय.
  • आंब्याचे अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील.
  • पण हा पदार्थ अजून चाखला नसेल तर तुम्ही मोठी गोष्ट मिस करत आहात.
उन्हाळ्याचा सीजन आता सुरु झाला असून सीजनल फळांचीही आता बाजारात रेलचेल दिसून येत आहे. उन्हाळ्यात वातावरणात वाढणारी उष्णता आपल्यासाठी त्रासदायक ठरतो. याकाळात आपल्याला मिळणारा एकमेव सुखद आनंद म्हणजे आंबा. हे फळ उन्हाळ्यातच बाजारात येते ज्यामुळे याकाळात मनभरुन आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. आंब्यापासून शेक, आमरस, ज्यूस असे अनेक पदार्थ बनवले जातात पण आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या खास मँगो डिशची रेसिपी सांगणार आहोत जिला चाखताच तुम्हाला स्वर्गाहून कमी वाटणार नाही.

बेसनाचा नाही यंदा घरी बनवा तांदळाचा चिला, याची कुरकरीत आणि खमंग चव नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

आजच्या या डिशचं नाव आहे मँगो मस्तानी. हे पुणे शहरातील एक लोकप्रिय थंडगार पेय आहे. यात आंब्याचा रस, आईस्क्रिम आणि सुक्यामेव्याचा वापर केला जातो. बाजारात तुम्हाला हे पेय फार महाग विकलं जाईल पण आम्ही तुम्हाला सांगतो की फक्त निवडक साहित्यापासून तुम्ही हे प्रसिद्ध ड्रिंक घरीच तयार करु शकता. चला जाणून घेऊया मँगो मस्तानीची रेसिपी.

साहित्य

  • १ मोठ्या आकाराचा आंबा
  • व्हॅनिला आईस्क्रिम किंवा मँगो आईस्क्रिम २ स्कूप
  • टुटी फ्रुटी १ ते दिड टेबलस्पून
  • ड्रायफ्रुट्स
लोणच्यापेक्षा लागेल भारी चव! गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा आंबट तिखट कैरीचा ठेचा, नोट करा रेसिपी

कृती

  • मँगो मस्तानी बनवण्यासाठी सर्वप्रथम आंबा धुवून घ्या.
  • आता अर्ध्या आंब्याचा रस तयार करा. यासाठी आंब्याचा गर काढून त्यात बर्फ आणि दूध घालून मिक्सरला फिरवा.
  • उरलेल्या अर्ध्या आंब्याचे तुम्हाला बारीक तुकडे करायचे आहेत.
  • आता एक ग्लास घ्या आणि त्यात सर्वात खाली आंब्याच्या रसाचा थर लावा.
  • मग यावर थोडं व्हॅनिला किंवा मँगो आईस्क्रिम घाला.
  • पुन्हा एकदा यावर आंब्याच्या रसाचा थर लावा.
  • यावर शेवटी तुम्ही थोडी बाजारात मिळणारी टुटी फ्रुटी देखील घालू शकता.
  • मग यावर तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सचे तुकडे घाला. यात तुम्ही काजू, बदाम, पिस्ता यांचा वापर करु शकता.
    शेवटी पुन्हा
  • तुमची चविष्ट आणि गारेगार मँगो मस्तीनी तयार आहे.
  • घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही ही डिश सर्व्ह करु शकता.
 

Web Title: Summer special make pune special mango mastani drink at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
1

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
2

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
3

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
4

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.