Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special Tips : फेकू नका, डोकं लावा! खतापासून मँगो टीपर्यंत आंब्याच्या सालीचा करता येतो अनेक प्रकारे वापर…

Mango Peel Use : आंबा खाल्ला आणि साल फेकली? मग तुम्ही मोठी चूक करत आहात. अनेकांना ठाऊक नाही पण आंब्याच्या सालीत अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे याचा वापर आपल्यासाठी फायद्याचा ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2026 | 10:51 AM
Summer Special Tips : फेकू नका, डोकं लावा! खतापासून मँगो टीपर्यंत आंब्याच्या सालीचा करता येतो अनेक प्रकारे वापर...

Summer Special Tips : फेकू नका, डोकं लावा! खतापासून मँगो टीपर्यंत आंब्याच्या सालीचा करता येतो अनेक प्रकारे वापर...

Follow Us
Follow Us:
  • आंबा खाल्ला पण साल फेकली, तुम्हीही असं करता का?
  • आंब्याची साल फेकू नका त्याचा योग्य वापर करा.
  • अनेक गोष्टींमध्ये आंब्याचा वापर केला जाऊ शकतो.
उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीजन. या सीजनमध्ये उष्णता हैराण करते पण आंबा एक अशी गोष्ट आहे जी आपल्या मनाला खुश करुन जाते. उन्हाळ्यातच ऑरगॅनिक आंबे बाजारात येतात. आता या आंब्याच्या सीजनमध्ये अनेक लोक मोठ्या प्रमाणात आंबे खरेदी करतात त्यांच्या चवीचा आनंद लुटतात परंतु याची साल मात्र कचऱ्याच्या पेटीत फेकून टाकतात. बहुतेक लोक साल निरुपयोगी आहे असे समजून खाल्ल्यानंतर फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का की आंब्याच्या सालीचा अनेक कामांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. आंब्याप्रमाणेच त्याच्या सालीतही अनेक गुणधर्म दडलेले असतात याचा वापर आपल्यासाठी चांगल्याच फायद्याचा ठरु शकतो. आंब्याच्या सालीत फायबर, खनिजे, जीवनसत्त्वे, पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनॉइड्ससारखे अनेक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. चला यापासून आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात ते सविस्तर जाणून घेऊया.

भोपळमध्ये वाढत आहे ‘ब्लड किक’ नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’

आंब्याच्या सालीचा वापर कसा करावा?

झाडांसाठी खत

तुमच्या घरात तुम्ही लाहान झाड किंवा रोप लावलं असेल तर त्यात तुम्ही आंब्याच्या सालीचा वापर करु शकता. ते रोपांसाठी एका किटकनाशकासारखे काम करते. चहा बनवल्यानंतर आंब्याच्या सालीची पेस्ट वापरेलेल्या चहाच्या पावडरमध्ये मिसळा. पाण्यात वापरलेली चहा पावडर आणि आंब्याची साल साठवून ठेवा. काही दिवसांनी याचे खत तयार होईल जे तुम्ही तुमच्या रोपांसाठी वापरु शकता. हे खत मातीत मिसळा आणि तुमच्या झाडांना किटकांपासून वाचवा.

आंब्याचा चहा

तुम्ही मँगो ज्यूस तर अनेकदा पिला असेल पण तुम्ही कधी मँगो टी ट्राय केली आहे का? सालीचा पुर्नवापर करुन तुम्ही आंब्याचा चहा देखील तयार करु शकता. यामुळे चहाला एक वेगळी चव मिळते. यासाठी एका पातेल्यात पाणी घ्या, त्यात आंब्याच्या साली टाका आणि उकळी येऊ द्या. तयार पाणी गाळून एका कपात टाका आणि तुमचा मँगो टी तयार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात मध देखील घालू शकता.

आंब्याच्या सालीचे चिप्स

हलक्या-फुलक्या भुकेला शमवण्यासाठी तुम्ही आंब्याच्या सालीचा वापर करु शकता. यासाठी आंब्याची साल काढल्यानंतर, ती उन्हात कडक सुकवून घ्या. आता सुकलेल्या या आंब्यांच्या सालीला गरमागरम तेलात काही मिनिटे तळा. तळलेले हे चिप्स एका प्लेटीत काढून त्यावर मीठ शिंपडा आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हे मँगो चिप्स खाण्यासाठी सर्व्ह करा.

एकाच महिन्यात दोन वेळा मासिक पाळी येते? महिलांच्या शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे बिघडते आरोग्य

त्वचेसाठी फायदेशीर

आपल्या त्वचेचे साैंदर्य वाढवण्यासाठीही तुम्ही आंब्याच्या सालीचा वापर करु शकता. आंब्याच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी याची मोठी मदत होते. तुम्ही आंब्याची ही साल त्वचेवर चोळू शकता. यामुळे त्वचा उजळ होण्यासही मदत होऊ शकते. तथापि, त्वचेवर कोणताही नवा उपाय करताना पॅच टेस्ट करणं अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Summer special tips dont throw you can use mango peels in many ways lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात
2

Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
3

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
4

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.