Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व

२०१९ पासून नवजात शिशूंना सूर्या हॉस्पिटलमधील मिल्क बँकेतील दूधाचा लाभ मिळाला आहे. सूर्या ह्युमन मिल्क बँक अत्याधुनिक पाश्चरायझेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मातांकडून दान होणा-या दूधाचे जतन करत आहे. गरजू नवजात शिशूंना मिल्ब बँकेतील दूध मिळण्याकरिता जनजागृतीवरही भर दिला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2026 | 04:30 PM
स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व

Follow Us
Follow Us:

सूर्या हॉस्पिटल हे महिला व बालकांचे आरोग्य जपण्यासाठी ओळखले जाते. या हॉस्पिटलने शनिवारी १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समाजसेवेचा संदेश दिला. जागतिक स्तनपान सप्ताहानंतर आयोजित या विशेष कार्यक्रमात दूध दान करणा-या मातांचा सत्कार करण्यात आला. वेळेपूर्वी जन्मलेली, कमी वजनाची आणि गंभीर आजारांचा सामना करणा-या नवजात बालकांसाठी आईचे दूध हे जीवनरक्षक औषध असते. सूर्या हॉस्पिटलच्या अत्याधुनिक मिल्क बँकच्या माध्यमातून गरजू आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित मानवी दूध उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमाद्वारे दात्या मातांच्या योगदानाला सलाम करत, मानवी दूध दान करणे हे थोर समाजकार्य आहे, ही बाब रुग्णालयाने सर्वांसमोर या उपक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित केली.

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

यावेळी जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्ताने नवजात शिशूंच्या पोषणाशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. कित्येकदा बाळंतपणानंतर आईचे दूध काही कारणास्तव उपलब्ध होत नसते किंवा अपुरे पडते. अशा वेळी नवजात बालकाला योग्य आणि पुरेसे पोषण मिळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत मानवी बँकेतील सुरक्षित आणि प्रक्रिया केलेले दूध हा वैद्यकीयदृष्ट्या उत्तम पर्याय ठरतो. आयुष्याच्या सुरुवातीच्या नाजूक दिवसांत अतिरिक्त पोषणाची गरज असलेल्या नवजात शिशूंसाठी दात्याचे दूध आरोग्यदायी मानले जाते. या उपक्रमाद्वारे अशा संकटग्रस्त बालकांच्या आरोग्यासाठी मानवी दूधाचे महत्त पटवून सांगण्यात आले.

२०१९ साली सूर्या ह्युमन मिल्क बँकेची स्थापना झाली. ही मिल्क बँक खासगी आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची मिल्क बँक मानली जाते. या बँकेने गेल्या सात वर्षांत २ हजारांहून अधिक गरजू नवजात शिशूंना दात्याचे दूध उपलब्ध करुन दिले आहे. सूर्या हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सुमारे १०० ते १२० नवजात शिशू कमी वजनाच्या समस्येमुळे उपचारांसाठी येतात. या बालकांच्या वैद्यकीय उपचारांत आईचे दूध महत्त्वाचे असते. या मिल्क बँकेच्या माध्यमातून या सर्व बालकांचे प्राण वाचवले जातात.

हा उपक्रम नवजात शिशूंच्या पोषणासंबंधित मूलभूत गरजेसाठी उपयुक्त ठरतो. प्रसूतीनंतर आईचे स्वतःचे दूध उपलब्ध होत नसेल किंवा अपुरे पडत असल्यास बाळाला मिल्क बँकेतून दूध दिले जाते. मिल्क बँकेतील दूधाची योग्य तपासणी केली जाते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मिल्क बँकेतील दूध नवजात शिशूला दिले जाते. वेळेआधी जन्मलेली आणि कमी वजनाची बालके यांच्यासाठी मानवी दूध गुणकारी मानले जाते. मिल्क बँकेतील दूध पचायला हलके असते. या दूधाच्या सेवनाने बालकाला आवश्यक पोषण मिळते. त्यामुळे नवजात शिशूंचे विविध आजारांपासून तसेच संसर्गापासून संरक्षण होते.

सूर्या हॉस्पिटलचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूपेंद्र एस. अवस्थी यांनी या उपक्रमाबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले,” वेळेआधी जन्मलेल्या बालकांना आईचे पुरेसे दूध मिळत नसल्यास त्यांना सुरक्षित दात्याचे दूध उपलब्ध करुन देणे, हे सूर्या ह्युमन मिल्क बँकेचा मुख्य उद्देश आहे. या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक बालकाला निरोगी आयुष्याची सुरुवात करून देणे हीसुद्धा एका प्रकारची सेवा आहे. या रुग्णालयात दूधाची सक्त तपासणी केली जाते. पाश्चरायझेशन, सुरक्षित साठवणूक आदींच्या माध्यमातून गरजू बालकांपर्यंत गुणवत्तापूर्ण दूध पोहोचवले जाते. याचसोबत मानवी दूध दानाबाबतचे गैरसमज दूर करून जनजागृती करण्याचाही रुग्णालयाचा प्रयत्न आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र माता या महत्त्वपूर्ण कार्यात सहभाग घेऊ शकतील.”

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध

या कार्यक्रमाला प्रसिद्ध कलाकार आणि नवजात शिशूंकरिता स्वतःचे दूध देणा-या माता जानकी मेहता यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून हजेरी लावली. स्तनपान करणा-या मातांनी आपले दूध दान करावे, असे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “आई म्हणून आपले दूध दुस-या बाळाला निरोगी आणि सशक्त बनवू शकते, ही भावना आनंददायी आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, अधिकाधिक मातांनी दातृत्वाची भावना जपत पुढाकार घ्यावा. आपले अतिरिक्त दूध सुरक्षितपणे दान करत गरजू बालकांना देत मदत करावी.”

सूर्या ह्युमन मिल्क बँकेत मानवी दूध स्विकारण्यापूर्वी दाता मातांची आवश्यक वैद्यकीय तपासणी केली जाते. प्राप्त दूधाची सखोल चाचण केल्यानंतर शुद्धीकरण, पाश्चरायजेशन आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यानंतर हे दूध नियंत्रित तापमानात सुरक्षितपणे साठवून ठेवले जाते. केवळ गरजू आणि वैद्यकीय निकषांनुसार पात्र असणा-या नवजात बालकांपर्यंत शुद्ध आणि सुरक्षित दूध पोहोचावे, याकरिता ही बहुस्तरीय आणि पारदर्शक पद्धत अंमलात आणली जाते.

सूर्या हॉस्पिटलच्यावतीने सर्व मातांना दूध दानाशी संबंधित सर्व शंका व भीती दूर करण्यासाठी समुपदेशन आणि वैद्यकीय मार्गदर्शन दिले जाते. इतर नवजात शिशूंसाठी दूध दान केल्यास स्वतःचे दूध कमी पडेल, हा अनेक मातांचा गैरसमज असतो. या गैससमजूतीला दूर सारण्याचे काम हॉस्पिटलच्यावतीने केले जाते. यामुळे मातांमध्ये दूध दानाविषयी कोणताची संकोच राहत नाही. त्या आत्मविश्वासाने या सामाजिक कार्यात सहभागी होतात.

सूर्या हॉस्पिटलचे सल्लागार आणि नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. हरी बालसुब्रमण्य म्हणाले, “अतिरिक्त दूध असलेल्या निरोगी मातानी योग्य वैद्यकीय तपासणीनंतर दूध दान करावे. या संपूर्ण प्रक्रियेत समुपदेशन, आरोग्य तपासणी, दूध संकलन आणि सुरक्षित प्रक्रियेचा समावेश असतो. सर्व सुरक्षा निकषांचे तंतोतंत पान करून मातांना योग्य निर्णय घेता यावा, याकरिता तज्ज्ञांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरते.”

सूर्या हॉस्पिटल्स मानवी दूधाच्या दानाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरिता कटिबद्ध आहे. अधिकाधिक पात्र मातांना दूध दानासाठी प्रोत्साहित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. गरजू नवजात शिशूंना वेळेवर सुरक्षित दूध मिळावे, त्याचा पाठपुरावा मजबूत व्हावा याकरिता खास प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच नवीन मातांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि आवश्यक वैद्यकीय सहकार्य पुरवण्याचेही कार्यही हॉस्पिटलकडून तत्परतेने पार पाडले जाते.

गणपती बाप्पाला मोदक का आहेत प्रिय? जाणून घ्या पारंपरिक प्रसादाचा रंजक आणि महत्वपूर्ण इतिहास

यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दाता मातांचा सत्कार करत त्यांच्या दातृत्वाविषयी कृतज्ञता साजरी करण्यात आली. आईने पोटच्या मूलाव्यतिरिक्त इतर नवजात शिशूसाठी दूध दान करणे हे त्या मूलासाठी मोठा आधार ठरतो. हा महत्त्वपूर्ण संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. गरजू बालकांच्या आरोग्यासाठी पुढे येणा-या मातांच्या या महान कार्याचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मानवी दूधदान म्हणजे काय?

    Ans: आईचे अतिरिक्त आणि सुरक्षितरीत्या संकलित केलेले दूध गरजू नवजात बाळांसाठी दान करण्याच्या प्रक्रियेला मानवी दूधदान म्हणतात.

  • Que: नवजात बाळांसाठी दात्यांकडून मिळणारे मानवी दूध का महत्त्वाचे आहे?

    Ans: विशेषतः आईचे दूध थेट मिळू न शकणाऱ्या काही नवजात बाळांसाठी दात्यांचे मानवी दूध पोषणाचा महत्त्वाचा स्रोत ठरू शकते. त्यातून बाळाला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.

  • Que: कोणत्या बाळांना दात्यांच्या मानवी दुधाची गरज भासू शकते?

    Ans: अकाली जन्मलेली, कमी वजनाची किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे आईचे दूध तात्पुरते मिळू न शकणारी बाळे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दात्यांच्या दुधाचा उपयोग होऊ शकतो.

Web Title: Surya hospital unique independence day initiative human milk donors honoured importance of milk donation for newborns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • breastfeeding
  • Health Care Tips
  • Health Updates

संबंधित बातम्या

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध
1

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
2

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी का प्यावे? जाणून घ्या यामागील आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक फायदे
4

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी का प्यावे? जाणून घ्या यामागील आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.