
मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे
Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट
श्वसनाच्या समस्या दूर करते
सूर्यनमस्कार श्वसनाच्या समस्या दूर करते. बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांचे श्वसनमार्गातील संसर्ग दूर करते आणि फुफ्फुसांची क्षमता आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह देखील वाढवते. शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्याकरिता सूर्यनमस्कार नियमित करा.
इन्सुलिन सुधारणा
नियमित सरावामुळे स्नायू ग्लुकोजचा अधिक चागल्या प्रकारे वापर करतात, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध कमी होण्यास मदत होते.
करण्याची योग्य पद्धत आणि वेळ
वेळ: सकाळी सूर्योदयाच्या वेळी रिकाम्या पोटी करणे सर्वात उत्तम. संध्याकाळी करायचे असल्यास जेवणानंतर ३ ते ४ तासांचा गॅप असावा.
गत्ती: मधुमेहाव्या रुग्णांनी सूर्य नमस्कार अतिशय जलद न करता, सावकाश आणि प्रत्येक आसनावर लक्ष केंद्रित करून करावे (उदा. १ मिनिटात साधारण १ किवा २ फेऱ्या).
फेऱ्या सुरुवातीला २ ते ३ फेऱ्यापासून सुरुवात करून हळूहळू क्षमतानुसार १० ते १२ फेऱ्यांपर्यंत वाढवाव्यात.
वजन व्यवस्थापन
लठ्ठपणा है टाइप-२ मधुमेहाचे मुख्य कारण आहे. सूर्य नमस्काराच्या एका फेरीत १३ ते १७ कॅलरीजपर्यंत जळतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी
महत्त्वाची खबरदारी
वैद्यकीय सल्ला सूर्य नमस्कार हे औषधोपचार आणि संतुलित आहाराचा पर्याय नाही. तुमच्या डॉक्टराच्या सल्ल्यानेच व्यायामाची सुरुवात करा. योग गुरुच्या सल्ल्यानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी सूर्यनमस्कार नेहमी संथ गतीने करावेत. हा तुमच्या जीवनशैलीचा चांगला भाग असू शकतो, परंतु तो औषधोपचार किवा डॉक्टराच्या सल्ल्याचा पर्याय नाही, या लोकांनी टाळावा ज्यांना उच्च रक्तदाब, तीव्र पाठदुखी (कमरदुखी), गुडघेदुखी किया हृदयविकार आहे, त्यांनी डॉक्टरांच्या किंवा योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय सूर्य नमस्कार करू नये.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)