Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

50 वर्षात कोणताही आजार नाही, आजही काळेभोर आहेत केस, बाबा रामदेव खातात 3 भाजी, शेकडो आजारांचा मुळासकट होईल नायनाट

निरोगी आणि रोगमुक्त राहण्यासाठी सात्विक अन्न खावे. त्यात आजारांना दूर ठेवण्याची शक्ती असून बाबा रामदेव गेल्या 50 वर्षांपासून आजारी पडले नाही. त्याच्या जेवणात 3 भाज्या असून 2 गोष्टी अजिबात खात नाहीत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 13, 2025 | 12:06 PM
निरोगी राहण्यासाठी काय खावे बाबा रामदेवांचा सल्ला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

निरोगी राहण्यासाठी काय खावे बाबा रामदेवांचा सल्ला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

Follow Us
Close
Follow Us:

59 वर्षांच्या वयातही स्वामी रामदेव पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि त्यांच्या घनदाट काळ्या केसांवरून त्यांच्या आरोग्याचा अंदाज लावता येतो. बाबा रामदेव दिवसातून फक्त एकदाच अन्न खातात, ज्यामध्ये 3 भाज्या निश्चित असतात. सात्विक आहार घेतल्यामुळे, त्यांना 50 वर्षांपासून कोणताही आजार झालेला नाही. त्याचे वजन 65 किलो आहे आणि हिमोग्लोबिन 17.5 आहे, रक्तदाब 70/110 आहे आणि साखरेची पातळी 70-75 च्या दरम्यान आहे. त्यांनी त्यांचा संपूर्ण आहार, जेवण आणि दैनंदिन दिनचर्या याबद्दल सर्व माहिती दिली आहे. 

Curly tales ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, 100 वर्षांच्या वयापर्यंत व्यक्तीला म्हातारे वाटू नये किंवा व्यक्तीने आजारी पडू नये आणि यासाठी सात्विक अन्न खावे आणि योगाभ्यास करावा. प्रत्येकाने रोज दोन योगाभ्यास नियमित करावेत कारण हे शरीराला आतून निरोगी आणि तरुण बनवतात. बालपणात, त्यांना एकदा डास चावल्यामुळे ताप आला आणि त्यानंतर त्यांना कधीही सर्दी, खोकला, अतिसार किंवा अन्नातून विषबाधा झाली नाही असेही त्यांनी सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock/Instagram)

बाबा रामदेव यांची दिनचर्या 

बाबा रामदेव यांनी त्यांच्या संपूर्ण दैनंदिन दिनचर्येबद्दल सांगितले. तुम्ही तुमची सकाळ कशी सुरू करता, तुम्ही काय खाता, तुम्ही पहिले काय खाता आणि शेवटी काय खाता हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी असे दोन पदार्थ खाऊ नका जे शेकडो आजारांना कारणीभूत ठरू शकतात असा सल्ला दिला.

आतड्यात सडलेल्या घाणीचा होईल अंत; बद्धकोष्ठताही होईल छुमंतर, Baba Ramdev चा देशी उपाय कराच

दिवसाची सुरूवात होते अशी 

सकाळी उठून प्यावे कोमट पाणी

रामदेव पहाटे 3 वाजता उठतात. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे हा त्यांचा नित्यनियम आहे आणि नंतर दैनंदिन कामाला सुरूवात करतात आणि सर्वांनी असेच करावे असंही त्यांनी म्हटलं. यानंतर रामदेव बाबा आंघोळ करून 1 तास ध्यान करतात आणि नंतर धावण्यासाठी जातात आणि त्यानंतर थेट लोकांना योग शिकवण्यास सुरुवात करतात. मुलाखतीत त्यांनी सांगितले की ते दिवसातून फक्त एकदाच जेवतात 

किती वेळा जेवावे?

दिवसातून एकदाच जेवणे योग्य

दिवसातून किती वेळा जेवावे हा प्रश्न लोकांच्या मनात अनेकदा येतो. जास्त वेळा खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. योगगुरूंच्या मते, दिवसातून फक्त एकदाच खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. जे जास्त शारीरिक श्रम करतात ते दिवसातून दोनदा जेवू शकतात. दिवसातून 3 वेळा जेवणाऱ्या लोकांना आजार होण्याचा धोका असतो आणि दिवसातून 4 वेळा जेवणे खूप धोकादायक असते असेही त्यांनी येथे नमूद केले आहे

कसे असते जेवण?

सात्विक जेवणाचा करा समावेश

दुपारी 11-12 वाजता जेवणाचा आस्वाद रामदेव बाबा घेतात. यानंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फक्त फळे खातात. 99 टक्के अन्नामध्ये कोणतेही धान्य नसते. या आहारात फळे आणि भाज्या भरपूर असतात, ज्यामध्ये दुधी भोपळा, झुकिनी आणि मिश्र भाज्यांचा समावेश असतो. त्यांना बटाटे खायला आवडत नाहीत आणि त्यांनी 20 वर्षांपासून धान्यही खाल्ले नाही असेही सांगितले. मात्र आता काही दिवस ते बाजरी खातात आणि काही दिवसांनी पुन्हा बाजरी खाणे सोडून देत असल्याचेही सांगितले. 

15 ते 20 किलो होईल वजन त्वरीत कमी, बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक फॉर्म्युला करा ट्राय

खाण्याची योग्य पद्धत कोणती?

बाबा रामदेव यांनी सांगितले की, दिवसातून सर्वात आधी फळे आणि सॅलडसारखे कच्चे अन्न खाल्ले पाहिजे. यानंतर, हिरव्या भाज्या, भाज्या, धान्ये आणि शेवटी काही गोड पदार्थ खा. पण मिठाईमध्ये साखर असू नये. यासाठी तुम्ही गोड फळे, सुकामेवा, गूळ, साखर, अंजीर इत्यादी खाऊ शकता. हे खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य ठरते आणि तुम्ही दीर्घकाळ आजारी न पडता निरोगी राहता. 

2 पदार्थ ठरतात घातक 

कोणते पदार्थ खाणे टाळावे

रामदेव यांच्या मते, भात आणि गहू खाणे घातक ठरू शकते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम हे खूप शक्तिशाली योग आहेत, प्रत्येकाने त्यांचा सराव केला पाहिजे. तसंच रात्री त्यांनी गोड पदार्थ, चहा, कॉफी, दही, ताक आणि चॉकलेट खाण्यास मनाई केली आहे. जर एखाद्याला झोपेची समस्या असेल तर त्यांनी कांदा खावा या उपायाने गाढ झोप येऊ शकते असा सल्ला त्यांनी दिला. 

हेल्दी पदार्थ कोणते?

कोणत्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे

अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब, गाजर, बीट, गव्हाचे गवत आणि कोरफड खावे. मुळा पोट आणि यकृतासाठी चांगला असतो. हे पोटातील निरोगी बॅक्टेरिया वाढवते. सीताफळ खाल्ल्याने कधीही अ‍ॅसिडिटी होणार नाही आणि ते कॅल्शियमने समृद्ध आहे असा सल्लाही यावेळी रामदेव बाबांनी मुलाखतीमध्ये दिला आहे. 

काय म्हणतात रामदेव बाबा?

Web Title: Swami baba ramdev eat one meal a day shared diet plain and morning routine to keep diseases away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • Health Tips
  • swami baba ramdev remedy

संबंधित बातम्या

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
1

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

मुलांपासून वृद्धांपर्यंत लठ्ठपणाचे ठरत आहेत बळी, आयुर्वेदातील पंचकर्म उपायाने मिळेल सुटका
2

मुलांपासून वृद्धांपर्यंत लठ्ठपणाचे ठरत आहेत बळी, आयुर्वेदातील पंचकर्म उपायाने मिळेल सुटका

Baba Ramdev: वात-पित्त आणि कफदोषावर बाबा रामदेवांचा रामबाण उपाय, वापरणे सहजसोपे
3

Baba Ramdev: वात-पित्त आणि कफदोषावर बाबा रामदेवांचा रामबाण उपाय, वापरणे सहजसोपे

ना प्रेग्नंन्सी, ना स्तनपान, तरीही होतंय Nipple Discharge, गंभीर आजाराचे लक्षण; दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर
4

ना प्रेग्नंन्सी, ना स्तनपान, तरीही होतंय Nipple Discharge, गंभीर आजाराचे लक्षण; दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.