जास्त वेळ उपाशी राहिल्यास शरीराला त्वरित ऊर्जा देणाऱ्या पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. त्यामुळे दीर्घकाळ उपाशी राहिल्यानंतर मिठाई, चॉकलेट किंवा गोड पेयांची क्रेव्हिंग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.
शरीराला पुरेशी झोप न मिळाल्यास थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. अशावेळी शरीर पटकन ऊर्जा मिळवून देणाऱ्या गोड पदार्थांची क्रेव्हिंग करतो. त्याचप्रमाणे कामाचा ताण, मूड स्विंग्स, एकटेपणा किंवा मानसिक थकवा यामुळेही काही लोकांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, यामुळे प्रत्येक तणावपूर्ण परिस्थितीनंतर गोड खाण्याची सवय लागू शकते, जी कालांतराने मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.
गोड खाण्याची तीव्र इच्छा यासोबत सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे किंवा अतिशय थकवा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, ब्लड शुगर टेस्ट करण्याची गरज भासू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी साखरयुक्त पदार्थ टाळावेत. बराच वेळ उपाशी राहिल्याने दिवसातून अनेक वेळा भूक वाढू शकते आणि गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे आहारात प्रथिने,फायबरयुक्त पदार्थ, संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळांचा समावेश करा. योग्य वेळी न जेवणे किंवा जास्त काळ उपाशी राहणे, तसेच उशीरा जेवणे यासारख्या सवयी टाळा. गोड खाण्याची इच्छा झाली तर फळांचा पर्याय निवडा. मात्र क्रेविंग सतत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Mouth Ulcer: वारंवार तोंड येतेय का? दुर्लक्ष करू नका; ‘या’ ५ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

