Kitchen Tips : गरम जेवण थेट फ्रिजमध्ये ठेवलं तर काय होतं? ‘या’ गैरसमजामागचं सत्य जाणून घ्या
त्यानंतर एमआरआय करण्यात आला. त्यामध्ये मेंदूतील गाठीची शक्यता व्यक्त करण्यात आली. पुढील तपासणीसाठी तिला वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथे दाखल करण्यात आले. तेथे कर्करोगतज्ज्ञांच्या पथकाने तिच्यावर उपचार सुरू करून प्रकृती स्थिर केली. त्यानंतर करण्यात आलेल्या पीईटी-सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात सुमारे २ सेंटीमीटर आकाराची लहान गाठ आढळली. बायोप्सीच्या तपासणीत ही फुफ्फुसाचा कर्करोगाची गाठ असल्याचे स्पष्ट झाले आणि तो कर्करोग मेंदूपर्यंत पसरल्याचेही निदान झाले.
या महिलेने यापूर्वी फुफ्फुसाच्या कर्करोगाची कोणतीही ठळक लक्षणे अनुभवली नव्हती. त्यामुळे हे निदान तिच्यासाठी अनपेक्षित होते. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे फुफ्फुसातील मूळ गाठ तुलनेने लहान होती, तरीही कर्करोग शरीरातील दूरच्या अवयवापर्यंत, म्हणजेच मेंदूपर्यंत, पसरला होता.
कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरलेला असल्याने शस्त्रक्रिया हा योग्य उपचार पर्याय मानला गेला नाही. त्याऐवजी मेंदूतील गाठीवर किरणोपचार करण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम करणारे कर्करोगविरोधी औषधोपचार सुरू करण्यात आले. निदान झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनीही तिच्यावर उपचार सुरू असून तिची जीवनशैली आणि जीवनमान चांगले आहे.
“अनेकांना असे वाटते की मूळ गाठ खूप मोठी झाल्यानंतरच कर्करोग शरीरात पसरतो; मात्र हे नेहमीच घडते असे नाही. काही कर्करोग जैविकदृष्ट्या अधिक आक्रमक असतात आणि मूळ गाठ लहान असतानाही ते शरीराच्या इतर भागात पसरू शकतात. या रुग्णाला कोणतीही ठळक लक्षणे नव्हती. पडल्यामुळे करण्यात आलेल्या मेंदूच्या तपासणीमुळेच कर्करोगाचे निदान झाले. सकारात्मक बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत कर्करोगावरील उपचारांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांनाही आता त्यांच्या आजाराच्या स्वरूपानुसार वैयक्तिक उपचारांचा लाभ मिळू शकतो. या उपचारांमुळे आजार नियंत्रणात ठेवणे, लक्षणे कमी करणे आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते,” असे डॉ. मेघल संघवी, कन्सल्टंट ऑन्को सर्जन, वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या मते, फुफ्फुसाचा कर्करोग केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येच होतो असे नाही. तंबाखू सेवनाचा कोणताही इतिहास नसलेल्या व्यक्तींनाही हा कर्करोग होऊ शकतो. सतत राहणारा खोकला, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार छातीचे संसर्ग होणे, डोकेदुखी, झटके येणे किंवा कोणतीही नवीन न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसल्यास, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी, विलंब न करता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
या ७२ वर्षीय महिलेच्या बाबतीत एका साध्या पडण्याच्या घटनेमुळे शरीरात लपून राहिलेला कर्करोग निदर्शनास आला. निदान अनपेक्षित असले तरी वेळेवर करण्यात आलेल्या तपासण्या आणि आधुनिक कर्करोग उपचारांमुळे तिला चांगले जीवनमान राखून उपचार सुरू ठेवणे शक्य झाले आहे. कोणत्याही अनपेक्षित तपासणीतील निष्कर्षांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणातून अधोरेखित होते.
आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

