Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

Sweets Craving Causes: सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. यामागची कारणे जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 15, 2026 | 06:20 PM
Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
Follow Us
Follow Us:
  • सतत गोड खावंसं का वाटतं?
  • ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
  • यामागची कारणे जाणून घ्या
जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटणे ही सवय सामान्य आहे. मात्र वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. सतत गोड खाण्याच्या इच्छेमागे आहार, झोप, ताणतणाव किंवा शरीरातील काही बदल कारणीभूत असू शकतात. गोड पदार्थ शरीराला झटपट ऊर्जा देतात आणि मेंदूच्या ‘रिवॉर्ड सिस्टम’ला सक्रिय करतात. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर काही काळ समाधान किंवा आनंदाची भावना निर्माण होऊ शकते. परंतु, वारंवार गोड खाण्याची इच्छा का होते, जाणून घ्या.

Health News: घरात पडली अन् CT स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं; 72 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला

दीर्घकाळ उपाशी राहणे

जास्त वेळ उपाशी राहिल्यास शरीराला त्वरित ऊर्जा देणाऱ्या पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. त्यामुळे दीर्घकाळ उपाशी राहिल्यानंतर मिठाई, चॉकलेट किंवा गोड पेयांची क्रेव्हिंग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.

झोपेची कमतरता आणि तणाव

शरीराला पुरेशी झोप न मिळाल्यास थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. अशावेळी शरीर पटकन ऊर्जा मिळवून देणाऱ्या गोड पदार्थांची क्रेव्हिंग करतो. त्याचप्रमाणे कामाचा ताण, मूड स्विंग्स, एकटेपणा किंवा मानसिक थकवा यामुळेही काही लोकांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, यामुळे प्रत्येक तणावपूर्ण परिस्थितीनंतर गोड खाण्याची सवय लागू शकते, जी कालांतराने मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.

कोणती लक्षणे गांभीर्याने घ्यावीत?

गोड खाण्याची तीव्र इच्छा यासोबत सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे किंवा अतिशय थकवा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, ब्लड शुगर टेस्ट करण्याची गरज भासू शकते.

क्रेविंग कमी करण्यासाठी काय करावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी साखरयुक्त पदार्थ टाळावेत. बराच वेळ उपाशी राहिल्याने दिवसातून अनेक वेळा भूक वाढू शकते आणि गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे आहारात प्रथिने,फायबरयुक्त पदार्थ, संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळांचा समावेश करा. योग्य वेळी न जेवणे किंवा जास्त काळ उपाशी राहणे, तसेच उशीरा जेवणे यासारख्या सवयी टाळा. गोड खाण्याची इच्छा झाली तर फळांचा पर्याय निवडा. मात्र क्रेविंग सतत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Mouth Ulcer: वारंवार तोंड येतेय का? दुर्लक्ष करू नका; ‘या’ ५ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Web Title: Sweet cravings why you crave sweets frequently causes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestyle news in marathi
  • sweets

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.