फूड पॉयझनिंग होण्याची लक्षणे
सर्वच ऋतूंमध्ये फूड पॉयझनिंग होते. फूड पॉयझनिंग होणे ही एक सामान्य समस्या आहे. अन्नातून किंवा पाण्यातून फूड पॉयझनिंग होण्याची दाट शक्यता असते. दरवर्षी फूड पॉयझनिंगमुळे हजारो पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. अन्नातून विषबाधा झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. फूड पॉयझनिंग झाल्यानंतर काही गंभीर लक्षणे दिसून येतात. यामागे काही कारण देखील आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत उघड्यावरील बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. जेवणातील एखादा पदार्थ खराब झाल्यावर खाल्ल्यानंतर सुद्धा फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला फूड पॉयझनिंग झाल्यानंतर नेमकी कोणती लक्षणे दिसून येतात? फूड पॉयझनिंग झाल्यानंतर काय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
फूड पॉयझनिंग होण्याची लक्षणे
अन्न पदार्थ कधी खराब होतात?
32 ते 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान वाढल्यानंतर अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होण्यास सुरुवात होते. त्यानंतर जर हे पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. 37 अंशांपेक्षा जास्त तापमान बॅक्टेरिया किंवा बुरशीसाठी अनुकूल आहे. या तापमानामध्ये पदार्थावर बुरशी लगेच तयार होते. तसेच गरम हवामानामध्ये कोणताही अन्नपदार्थ ठेवल्यास तो लवकर खराब होऊन जातो. त्यामुळे नेहमी ताजे आणि पचनास हलके असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
हे देखील वाचा: स्वयंपाक घरात गॅसवर ठेवलेले दूध लगेच सांडते का? जाणून घ्या टिप्स
फूड पॉयझनिंग होण्याची लक्षणे