Tanishq Launches Adhyantara Jewellery: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती डिमरीसह चित्रित करण्यात आलेले कॅम्पेन या सुंदर संकल्पनेला एका लखलखत्या आणि जादुई दृश्यात्मक दुनियेच्या माध्यमातून पडद्यावर जिवंत करते. यात हे देखणे दागिने आणि त्यांची खगोलीय प्रेरणा एकमेकांमध्ये अत्यंत नैसर्गिकरीत्या एकरूप होऊन जातात. हे कलेक्शन सादर करण्याची तिची अनोखी शैली त्या स्त्रीचा आत्मविश्वास, तिचे वेगळेपण आणि तिचा आधुनिक दृष्टिकोन अचूकपणे प्रतिबिंबित करते, जिला डोळ्यांसमोर ठेवून या ‘अध्यंतरा’ कलेक्शनला एक सुंदर आकार देण्यात आला आहे. Tanishq Launches Adhyantara Jewellery:
श्रीमती पेल्की त्शेरिंग, चीफ मार्केटिंग ऑफिसर, तनिष्क म्हणाल्या,”धनत्रयोदशी हा एक असा पावन मुहूर्त आहे, जेव्हा आपण समृद्धी, सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करतो. हा सण तनिष्कसाठी देखील अतिशय विशेष आणि महत्त्वाचा आहे. ‘अध्यंतरा’च्या माध्यमातून, आम्हाला विश्वाच्या अथांग जादुई आकर्षणाचा आणि अद्भूत रहस्यांचा वेध घ्यायचा आहे, तसेच हे सौंदर्य महिलेच्या आणखी जवळ आणायचे आहे, जी आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.
आमच्यासाठी, प्रत्येक स्त्री स्वतःमध्येच एक संपूर्ण विश्व आहे जिच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत, जी सतत पुढे पाऊल टाकत आहे आणि जिच्या डोळ्यांत प्रत्यक्षात उतरण्याची वाट पाहणारी अगणित स्वप्ने आहेत. आमच्या डिझायनर्सनी खगोलीय आकृत्यांचे सौंदर्य, त्यांचे रहस्य आणि त्यांचे दिव्य तेज आधुनिक दागिन्यांमध्ये जिवंत केले आहे.
हे कलेक्शन भारतीय कारीगरीचे वैभव आणि आजच्या काळातील आधुनिक दृष्टिकोन यांचा एक अद्भूत संगम आहे. या उत्सवाच्या काळात, ‘अध्यंतरा’ प्रत्येक स्त्रीला काहीतरी वेगळे पाहण्याचे, या अलौकिक सौंदर्याचा स्वीकार करण्याचे आणि या अद्भूत आनंदाचा उत्सव साजरा करण्याचे एक सुंदर आमंत्रण आहे.”
श्रीमती गरिमा माहेश्वरी, हेड ऑफ डिझाईन, तनिष्क म्हणाल्या,”अध्यंतरा’ने आम्हाला डिझाईनच्या एका संपूर्ण नवीन दृष्टिकोनातून विश्वाचा शोध घेण्याची एक सुवर्णसंधी दिली. आम्ही खगोलीय आकृत्यांची मंत्रमुग्ध करणारी हालचाल, प्रकाशाचा जादुई खेळ आणि विश्वातील अद्भूत गुंतागुंत यापासून प्रेरणा घेतली आहे.
‘अॅनिमल’ साठी ४० लाख तर, Spirit साठी घेतले एवढे कोटी रुपये; तृप्ती डिमरीच्या फी मध्ये ९०% वाढ
आकाशातील हेच अनोखे चमत्कार आज या विलोभनीय आकृत्या आणि अत्यंत सूक्ष्म कारागिरीच्या रूपाने समोर आले आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विलक्षण अचूकता आणि अजोड कौशल्याची गरज होती मग ते अप्रतिम 3D आकार असोत, थरांचे काम असलेली ‘बादरूम’ कला असो, पेटेंट मिळालेले 3D ग्लास कुंदन असो, किंवा हाताने कोरलेले स्टोन्स आणि इनॅमलचे अनोखे तंत्र असो.
याचा प्रत्येक भाग विश्वाचे एक वेगळे रूप स्वतःमध्ये सामावून घेतो, ज्यामुळे प्रकाश, खोली आणि आकाराचा एक संमोहन करणारा ताळमेळ तयार होतो. याचा परिणाम म्हणजे एक असे कलेक्शन आहे, जिथे कल्पनाशक्ती आणि नाविन्य यांचा संगम होतो; आणि तनिष्कच्या कसदार कारीगरीच्या माध्यमातून विश्वाच्या त्या अनंत जादुला एका अशा भाषेत गुंफले गेले आहे जी आधुनिक असण्यासोबतच सदाबहार देखील वाटते.”
Ans: धनत्रयोदशीच्या निमित्ताने हे कलेक्शन लाँच केले
Ans: अभिनेत्री तृप्ती डिमरी या कॅम्पेनमध्ये झळकत आहे.
Ans: अथांग ब्रह्मांडाचे सौंदर्य आणि खगोलीय आकृत्या ही या कलेक्शनची प्रेरणा






