Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बटाट्याचा मसालेदार सामोसा नाही तर हा आहे नूडल्सने भरलेला चायनीज सामोसा; नोट करा रेसिपी

Chinese Samosa Recipe : सामोसा हा भारतीयांच्या आवडीचे स्ट्रीट फूड आहे पण या पदार्थाला एका अनोख्या शैलीत तुम्ही कधी खाऊन पाहिले आहे का? इंडो चायनीज लव्हर्सना हा चायनीज सामोसा नक्कीच आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 09, 2025 | 08:15 PM
बटाट्याचा मसालेदार सामोसा नाही तर हा आहे नूडल्सने भरलेला चायनीज सामोसा; नोट करा रेसिपी

बटाट्याचा मसालेदार सामोसा नाही तर हा आहे नूडल्सने भरलेला चायनीज सामोसा; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

इंडियन स्टाईल समोसा आपण सगळ्यांनी खाल्ला असेल, पण आजकाल चायनीज ट्विस्ट दिलेले समोसेही लोकांना खूप आवडतात. चायनीज पदार्थांमध्ये नूडल्स, भाज्या आणि सॉसेसचा वापर करून बनवलेले हे समोसे बाहेरून खुसखुशीत आणि आतून मसालेदार-टेस्टी असतात. मुलांना, तरुणांना आणि पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांना चायनीज समोसा अगदी भन्नाट लागतो. विशेष म्हणजे हे समोसे हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले ताजेतवाने आणि हेल्दी लागतात.

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड पॅटिस, हिरव्या चटणीसोबत लगेच चविष्ट

चायनीज समोश्यामध्ये मुख्यतः शिजवलेले नूडल्स, गाजर, कोबी, कॅप्सिकम, स्प्रिंग अनियन अशा चिरलेल्या भाज्या, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. हे सारण कुरकुरीत समोश्याच्या पारीत भरून तळून घेतल्यावर अप्रतिम टेस्ट मिळते. विशेष म्हणजे या समोश्याबरोबर टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी दिल्यास खाणाऱ्यांची मजा दुप्पट होते.

शालेय टिफिन, संध्याकाळचे नाश्ते किंवा सणावाराला वेगळं काही करायचं असेल तर हा चायनीज समोसा उत्तम पर्याय ठरतो. अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने बनणारा हा पदार्थ घरातील प्रत्येकाच्या चवीला रुचकर लागतो. चला तर मग पाहूया स्वादिष्ट चायनीज समोसा कसा बनवायचा.

साहित्य

  • १ कप मैदा
  • १ टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार (पीठ मळण्यासाठी)
  • १ कप शिजवलेले नूडल्स
  • ½ कप किसलेला कोबी
  • ½ कप गाजर किसलेले
  • ¼ कप कॅप्सिकम बारीक चिरलेले
  • २ टेबलस्पून स्प्रिंग अनियन
  • १ टीस्पून सोया सॉस
  • १ टीस्पून चिली सॉस
  • १ टीस्पून व्हिनेगर
  • मीठ व मिरेपूड चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल
Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम मैदा, मीठ व तेल घेऊन पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या व ओलसर कापड झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवा.
  • कढईत थोडं तेल गरम करून त्यात गाजर, कोबी, कॅप्सिकम व स्प्रिंग अनियन हलकेच परता.
  • आता त्यात शिजवलेले नूडल्स, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, मीठ व मिरेपूड घालून छान मिसळा. हे सारण तयार ठेवा.
  • मळलेले पीठ लहान लहान गोळे करून पारी लाटा व अर्धवट कापा.
  • प्रत्येक अर्धवट पारीत कोन बनवून त्यात तयार केलेले नूडल्सचे सारण भरा.
  • समोश्याचे कडे पाण्याने सील करून तयार करा.
  • कढईत गरम तेलात हे समोसे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम चायनीज समोसा शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

Web Title: Tasty and unique chinese samosa recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • marathi recipe
  • samosa recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
1

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
2

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
3

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
4

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.