Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेस्टी आहे पण हेल्दी आहे… चाॅकलेट सोडा, काही मिनिटांतच घरी बनवा ‘डेट्स बार’

Dates Bar Recipe : घरच्या घरी तयार केलेले हे हेल्दी डेट्स बार केवळ चविष्टच नाहीत तर शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण देणारे आहेत. तुम्ही एकदाच घरी बनवून अनेक महिनोंमहिने यांची मजा लुटू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 03:00 PM
टेस्टी आहे पण हेल्दी आहे... चाॅकलेट सोडा, काही मिनिटांतच घरी बनवा 'डेट्स बार'

टेस्टी आहे पण हेल्दी आहे... चाॅकलेट सोडा, काही मिनिटांतच घरी बनवा 'डेट्स बार'

Follow Us
Follow Us:
  • डेट्ल बार विकत देखील मिळतात.
  • पण जी गोष्ट सहजतेने घरी बनू शकते ती खेरदी कशाला करायची?
  • तुम्ही घरीच डेट्स बार बनवून रोज याची चव घेऊ शकता.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीराला पटकन ऊर्जा देणारा आणि त्याचवेळी पौष्टिक असलेला आहार निवडणे खूप महत्त्वाचे झाले आहे. बाजारात सहज मिळणारे एनर्जी बार्स आकर्षक दिसतात, पण त्यात साखर, प्रिझर्वेटिव्ह्ज आणि कृत्रिम घटकांचे प्रमाण जास्त असू शकते. अशा वेळी घरच्या घरी तयार केलेले डेट्स बार हा एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक पर्याय ठरतो.

रेस्टाॅरंट कशाला… घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारं ‘हरियाली चिकन टिक्का’, पार्टी स्नॅक्ससाठीचा परफेक्ट पर्याय

खजूर म्हणजेच डेट्स हे नैसर्गिक गोडवा देणारे, फायबर, आयर्न आणि विविध खनिजांनी समृद्ध असे फळ आहे. त्यामुळे या बारमध्ये वेगळी साखर घालण्याची गरजच भासत नाही. ड्रायफ्रूट्स आणि बिया यांसोबत खजूर एकत्र केल्यास शरीराला आवश्यक असलेले पोषण सहज मिळते. हे बार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी योग्य आहेत. सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी, वर्कआउटनंतर एनर्जी मिळवण्यासाठी किंवा मधल्या वेळेत हेल्दी स्नॅक म्हणून हे डेट्स बार उत्तम पर्याय ठरतात. शिवाय, हे बार दीर्घकाळ टिकतात आणि बनवायलाही अतिशय सोपे आहेत. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य :

  • 1 कप खजूर (बारीक चिरलेले)
  • ½ कप बदाम (चिरलेले)
  • ½ कप काजू (चिरलेले)
  • ¼ कप अक्रोड
  • 2 टेबलस्पून तीळ
  • 2 टेबलस्पून भोपळ्याच्या बिया किंवा सूर्यफूल बिया
  • 1 टेबलस्पून तूप
  • ½ टीस्पून वेलची पावडर (ऑप्शनल)
Recipe : मऊ, स्वादिष्ट… सर्वांच्या आवडीची रेस्टॉरंट स्टाईल ‘पनीर नान’ बनवा घरच्या घरी, आजच नोट करा रेसिपी

कृती :

  • सर्वप्रथम कढईत तीळ, बदाम, काजू आणि अक्रोड हलक्या आचेवर कोरडे भाजून घ्या. बाजूला काढून ठेवा.
  • त्याच कढईत तूप गरम करून त्यात चिरलेले खजूर घाला. खजूर मऊ होईपर्यंत सतत हलवत परतून घ्या.
  • खजूर नरम झाल्यावर त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि बिया घालून चांगले मिक्स करा.
  • आता वेलची पावडर घालून मिश्रण नीट एकजीव करा.
  • गॅस बंद करून हे मिश्रण तुप लावलेल्या ट्रे किंवा प्लेटमध्ये काढा.
  • वरून हलक्या हाताने दाबून समतल करा.
  • थंड झाल्यावर हवे त्या आकारात बार किंवा चौकोनी तुकडे कापा.
  • हे डेट्स बार हवाबंद डब्यात ठेवले तर 7-10 दिवस टिकतात.
  • अधिक चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडेसे कोको पावडर किंवा ड्राय फ्रूट पावडरही घालू शकता.
  • पूर्णपणे साखरमुक्त असल्यामुळे हे बार हेल्दी स्नॅक म्हणून उत्तम आहेत.
 

Web Title: Tasty yet healthy skip the chocolate and make dates bar at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
1

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
3

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
4

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.