भाषा ही संवाद साधण्याचं माध्यम आहे. जगात अनेक भाषा आहे त्यातल्या फ्रेंच स्पॅनिश आणि इंग्रजी या भाषांची जागतिक पातळीर बऱ्यापैकी स्वत:चं स्थान मिळवलं आहे. भारताचा विचार करायचा झाल्यास बहुतांश हिंदी भाषेनंतर इंग्रजी भाषेला संवाद साधण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. इंग्रजांनी दीडशे वर्ष देशावर राज्य केलं खरं पण त्यांची भाषा मात्र इथेच सोडून गेले. ही इंग्रजी भाषा देशात इतकी रुळली की आता सर्वसामान्यांच्या तोंडी अगदी सहस बसली आहे. याच भाषेतले अगदी सगळ्यांच्या तोंडी रेंगाळणारे शब्द म्हणजे Thanks आणि Sorry. असं म्हणतात प्रत्येक भाषेची काही न काही गंमत असते, तसंच या इंग्रजीतील Thanks या शब्दाची देखील एक गोष्ट आहे, हे तुम्हाला माहितेय का ?
मराठीत एक वाक्य कायम म्हटलं जातं, मराठी भाषा वळवावी तशी वळते. आबा या शब्दावरील आ अक्षरावर एक अनुस्वार काय दिला तर त्याचा आंबा होतो. या एका छोट्याशा अनुस्वाराने एका शब्दाचा वेगळाच अर्थ निघतो. हीच गंमत फक्त मराठी भाषेचीच नाही तर इंग्रजी भाषेची सुद्धा आहे. इंग्रजी भाषेतला Thanks किंवा Thank You हे शब्द कोणाला माहितच नाही असा एकही भारतीय नाही. पण हेच जर तुम्हाला असं सांगितलं की, Thanks किंवा Thank You या दोन्हीचा अर्थ एक नसून तो वेगवेगळा आहे तर ? हो हे खरंय की सर्सासपणे वापरण्यात येणाऱ्या या दोन्ही शब्दांचा अर्थ हा खूप वेगवेगळा आहे.
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण Thanks किंवा Thank You हे शब्द वापरतो. मात्र असं असलं तरी Thanks किंवा Thank You कुठे आणि कसा वापरावा हे कळलं पाहिजे.
एखाद्याचे आभार व्यक्त करताना आपण Thanks म्हणतो. कधी ते औपचारिक ठिकाणी काम करणाऱ्या कलीगना तर कधी अनोळखी व्यक्तीला. पण तुम्हाला माहितेय का, खरंतर जवळच्या माणसांचे आभार प्रेमपुर्वक व्यक्त करताना Thanks म्हणावं असं म्हणतात. कुटुंब किंवा मित्र मैत्रिणीचे आभार मानताना Thanks म्हणावं असं सांगितलं जातं. तसंच Thanks म्हणण्यात प्रेम आणि आभार व्यक्त होतात.
कामाच्या ठिकाणी किंवा एखादी वयस्कर किंवा आदरार्थी व्यक्ती जेव्हा तुम्हाला मदत करते किंवा तुमच्या कामाचं कौतुक करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचे आभार मानताना Thank You असं म्हणावं. Thank You म्हणजे तुम्ही आभार आणि आदर व्यक्त करता.