फोटो सौजन्य: Pinterest
यासोबतच टाटा पंच मायक्रो SUV व्हर्जनलाही 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती. त्यामुळे मजबूत आणि सुरक्षित कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा पंच एक विश्वासार्ह पर्याय ठरतो. टाटा पंचला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवून देणाऱ्या प्रमुख सेफ्टी फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतातील पहिला AI-Defined Two-Wheeler प्लॅटफॉर्म लाँच, देशातील ऑटो इंडस्ट्रीला मिळणार मोठी चालना
टाटा पंचमध्ये 360-डिग्री SVS HD कॅमेरा देण्यात आला असून, त्यात ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरचाही समावेश आहे. या फीचरमुळे कारच्या चारही बाजूंचा स्पष्ट दृष्टीकोन मिळतो. त्यामुळे गर्दीच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणे तसेच अरुंद जागेत पार्किंग करणे अधिक सोपे होते.
या कारमध्ये मजबूत हाय-स्ट्रेंथ बॉडी शेल देण्यात आली आहे, जी अपघाताच्या वेळी निर्माण होणारी ऊर्जा शोषून घेते. यामुळे केबिनमधील प्रवाशांचे संरक्षण होते. ही बॉडी शेल प्रवाशांसाठी एक सुरक्षित कवच निर्माण करते, ज्यामुळे अपघाताच्या वेळी केबिनचा आकार कायम राहतो. कोणत्याही गाडीच्या सेफ्टी रेटिंगमध्ये या घटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
2026 टाटा पंचमध्ये स्टँडर्ड सेफ्टी फीचर म्हणून 6 एअरबॅग्स देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, पुढील प्रवाशांसाठी साइड एअरबॅग्स आणि कर्टन एअरबॅग्सचा समावेश आहे. हे एअरबॅग्स वाहनातील सर्व प्रवाशांना सर्व बाजूंनी सुरक्षा प्रदान करतात.
टाटा पंचमध्ये हिल डिसेंट कंट्रोल फीचर देण्यात आले आहे, जे उताराच्या रस्त्यावर गाडी खाली उतरताना अधिक चांगला ताबा देते. या तंत्रज्ञानामुळे ड्रायव्हरला आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे वाहन चालवता येते.
Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री
या कारमध्ये ESP सुविधा देण्यात आली असून, अचानक कार डगमगण्याची शक्यता निर्माण झाल्यास ड्रायव्हरचा ताबा वाढवते. ही प्रणाली वाहन योग्य मार्गावर ठेवण्यास मदत करते, अन्यथा अशा परिस्थितीत गाडी घसरू शकते किंवा पलटण्याची शक्यता असते.






