बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत(फोटो-सोशल मीडिया)
Will the ICC World Cup 2026 schedule change? बांगलादेश क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधून अधिकृतपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ते त्यांचे संघ त्यांचे सामने खेळण्यासाठी भारतात पाठवणार नाहीत. या निर्णयामुळे टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत बांगलादेशचा प्रवास संपुष्टात आला आहे. पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंकेत विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.परंतु, सुरक्षा आणि इतर परिस्थितीचे कारण पुढे करून बांगलादेशने या स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
बांगलादेशच्या बाहेर पडल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अशांतता पसरली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सहभागी होईल का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहे. सर्वांचे लक्ष आता पीसीबीच्या पुढील निर्णयाकडे असणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप आपला अधिकृतपणे टी-२० विश्वचषकासाठी त्यांचा संघ जाहीर करण्यात आलेला नाही. आयसीसीच्या नियमांनुसार सर्व संघांनी स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिना आधी त्यांचे संघ जाहीर करणे आवश्यक असते. टी-२० विश्वचषकाचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी खेळवबाळ जाणार आहे.परंतु, संघाची घोषणा ७ जानेवारीपर्यंत व्हायला होणे गरजेचे होते, परंतु ही अंतिम मुदत आता निघून गेली आहे.
सध्या, पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करत असून अद्याप संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. अंतर्गत वृत्तांत अस आहे, की जर बांगलादेश टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला तर पाकिस्तान संघ देखील स्पर्धेत बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. कधीकधी पाकिस्तानकडून अशी विधाने देखील समोर येत आहेत जी बांगलादेशवर विश्वचषकात न खेळण्यासाठी दबाव आणत असल्याचे चित्र उभी करतात.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतरच पीसीबीचे हेतू स्पष्ट हौस शकतो. जर संघाची घोषणा फक्त ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी करण्यात आली तर पाकिस्तान विश्वचषकात खेळण्याबाबत अनिश्चित असल्याचे चिन्ह मानले जाईल. जर विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली गेली तर पाकिस्तान स्पर्धा खेळेल हे मात्र निश्चित होऊ शकते.
बांगलादेश संघाने स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, हे अत्यंत अशक्य मानले जात आहे. स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस बाकी असल्याने, वेळापत्रकात काही एक बदल अपेक्षित नाही. स्कॉटलंड संघाला बांगलादेशच्या जागी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेश संघ जे सामने खेळणार होते तेच सामने खेळणार.






