पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे
पाचगणी नगरपरिषदेच्या अलीकडील निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित श्री घाटजाई शहर विकास आघाडीने १६+१ जागांवर विजय मिळवत भक्कम एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी झालेल्या निवड प्रक्रियेत कोणताही विरोध न होता तिन्ही पदांवर बिनविरोध निवड जाहीर झाली.
महिला विनयभंग प्रकरणी खासदार निलेश लंके यांच्या बंधूला हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
या वेळी नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, महेश खांडके, राजेंद्र पारटे, अमित कांबळे, आकाश बगाडे, परवीन मेमन, राजश्री सणस, अमृता गोळे, माधुरी कासुर्डे, स्वाती कांबळे, शिल्पा माने, विमल भिलारे, सुप्रिया माने तसेच विरोधी गटातील लक्ष्मी कऱ्हाडकर, अभिलाषा कऱ्हाडकर, वैभव कऱ्हाडकर, प्रसाद कारंजकर, विनोद बिरामणे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या वेळी पालिकेच्या आवारात नागरिक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
“मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा…”; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?
दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषदेतील जबाबदाऱ्यांचे वाटप करत सर्वांना संधी देण्याचे धोरण राबवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीतील योगदानानुसार प्रत्येक कार्यकर्त्याला मानाचे स्थान दिले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






