उपनगराध्यक्षपदी नासिरभाई मुलाणी यांची बिनविरोध निवड
नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिलीच सर्वसाधारण सभा
नासिरभाई मुलाणी महाबळेश्वरचे उपनगराध्यक्ष
र्वसाधारण सभेचे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष सुनील शिंदे
महाबळेश्वर: महाबळेश्वर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिलीच सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नासिरभाई मुलाणी यांची महाबळेश्वर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड जाहीर होताच सभागृहात उपस्थित सर्व नगरसेवकांनी टाळ्यांच्या गजरात मुलाणी यांच्या निवडीचे स्वागत केले.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सर्वसाधारण सभेचे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष सुनील शिंदे होते. यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील हेही सभेला उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक ७ मधून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक नासिरभाई मुलाणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
पीठासन अधिकारी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी उमेदवारी अर्जाची छाननी करून मुलाणी यांचा अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी नासिरभाई मुलाणी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी नासिरभाई मुलाणी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या सभागृहात घोषित केले.
ZP Election : महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर; अखेरच्या दिवशी तब्बल…
निवड जाहीर होताच नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहातील गटनेते संजय जंगम, विरोधी पक्षाचे गटनेते तसेच अन्य नगरसेवकांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.या वेळी भाजपचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, अफजल सुतार, विमलताई पार्टे, संगीता वाडकर, संतोष शिंदे, रोहित ढेबे,स्मिता पाटील व सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभागृहाबाहेर मुलाणी यांचे समर्थक व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नासिर मुलाणी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर मुलाणी यांनी नगरपरिषद प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हे सुद्धा वाचा : राजकीय घडामोडींना वेग, कोल्हापुरात भाजपचाच महापौर? शिंदे सेनेच्या हालचालींवर काँग्रेसचे लक्ष
महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर
महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि उमेदवार यांची रेलचेल सुरू होती. ढोल-ताशांचे गजर, बॅनरबाजी आणि घोषणाबाजी करत उमेदवारांनी आपले शक्तिप्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज दाखल केले. या गदारोळात एकूण ३८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.






