Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान- पाठीवर वाढलेला काळेपणा होईल कायमचा गायब! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल गोरीपान

पाठ आणि मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी दही आणि बेसनाचा फेसपॅक लावावा. यामुळे डेड स्किन नष्ट होण्यासोबतच मानेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2026 | 10:17 AM
मान- पाठीवर वाढलेला काळेपणा होईल कायमचा गायब! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल गोरीपान

मान- पाठीवर वाढलेला काळेपणा होईल कायमचा गायब! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल गोरीपान

Follow Us
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिला कायमच चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात. चेहऱ्यावरील सौंदर्य कायमच टिकून राहावे, यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण हात, पाय, मान आणि पाठीच्या त्वचेकडे जास्त लक्ष दिले जात नाही. बऱ्याचदा मानेवर वाढलेल्या काळेपणामुळे महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. याशिवाय पाठीवर वाढलेल्या काळेपणामुळे डीप नेक ब्लाऊज परिधान करताना महिला खूप जास्त विचार करतात. पाठ, मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम, लोशन आणि जेलचा वापर करतात. पण वारंवार केमिकलयुक्त स्किन केअरचा वापर केल्यामुळे त्वचा खूप जास्त कोरडी पडते आणि चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होऊन जातो. याशिवाय वारंवार चुकीच्या स्किन केअरचा वापर केल्यामुळे मान आणि पाठीवरील त्वचा आणखीनच काळी वाटते.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा घरगुती फेसमास्क, सकाळी उठताच त्वचेवर येईल चमकदार ग्लो

त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअरसोबतच महागड्या स्किन ट्रीटमेंट सुद्धा करून घेतात. यामुळे त्वचेवर सौंदर्य वाढते, पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचा निस्तेज होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मान आणि पाठीवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. स्वयंपाक घरातील हे पदार्थ चेहऱ्यावर ग्लो आणतील आणि त्वचा कायमच चमकदार ठेवण्यास मदत करतील.

मान आणि पाठीवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी उपाय:

उन्हामुळे शरीरावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन, दही, लिंबाचा रस वाटीमध्ये एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट मान आणि पाठीवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करून थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासोबतच चेहऱ्यावर आलेले डाग सुद्धा घालवतात. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेसाठी नैसर्गिक ब्लिच आहे. चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी दही आणि बेसनाचा वापर करावा.

बटाट्याचा वापर स्वयंपाक घरात जेवणासाठी केला जातो. याशिवाय चेहऱ्यावर आलेले डाग आणि टॅनिंग कमी करण्यासाठी सुद्धा बटाट्याचा वापर करू शकता. यासाठी बटाटा किसून त्यातील रस काढून घ्या. त्यानंतर संपूर्ण पाठ आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळेल.

उन्हाळ्यात वाटेल कायमच फ्रेश! झाडूसारख्या केसांवर नियमित लावा गुलाब पाणी, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

मान आणि पाठीवर खूप जास्त काळेपणा वाढल्यास बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून त्याची पेस्ट तयार करावी. तयार केलेली पेस्ट संपूर्ण मान आणि पाठीवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन निघून येईल आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. त्वचेसाठी बेकिंग सोडा अतिशय प्रभावी मानला जातो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The blackness on the neck and back will disappear forever the use of these foods in the kitchen will make the skin fair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
2

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
3

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
4

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.