बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? 'हे' उपाय केल्यास धुळीच्या अॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका
आपल्यापैकी अनेकांना धुळीची ऍलर्जी असते. अशा लोकांना जरा धुळीच्या संपर्कात आल्यावर सतत शिंका येतात, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे सुजतात, नाकही वाहते. वास्तविक, धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. यासह हवेतील परागकण, प्राण्यांचे केस, बॅक्टेरियांमुळे देखील ऍलर्जी होते. या ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली तरी याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. अशा परिस्थितीत धुळीची ऍलर्जी दूर करण्यासाठी घरगुती उपाय करता येतील.(फोटो सौजन्य – istock)
आहारात दही, ताक, चीज यांचा समावेश करावा, या पदार्थांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. ज्यामुळे ऍलर्जीचा त्रास उद्भवत नाही.धुळीची अॅलर्जी टाळण्यासाठी आँहारात पपई, लिंबू, संत्रीसारख्या विटामिन सी, विटामिन ई युक्त पदार्थांचा समावेश करावा.ग्रीन टी सेवन करणे फायद्याचे ठरेल. यातील अॅन्टीऑक्सिडंट्स शरीरात अॅलर्जीची रिअॅक्शन रोखतात.
तुम्ही मधाचे सेवन करू शकता.धुळीमुळे सतत शिंका येत असतील तर दिवसातून दोन वेळा एक लहान चमचा मधाचे सेवन करावे.निलगिरीचे तेल गरम पाण्यात घालून वाफ घेतल्यास धुळीमुळे उद्भवणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच या वाफेमुळे सायनसचे पॅकेज मोकळे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये काहींना वारंवार शिंका आणि सर्दी होते. थंड वातावरणात बाहेर गेल्यानंतर काहींना लगेच सर्दी होते. सर्दी झाल्यानंतर नाकातून पाणी येणे, शिंका येणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. अशावेळी बाहेर फिरायला जाताना मास्क लावून बाहेर जावे.
बाहेर जाऊन आल्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे नाकातील हानिकारक विषाणू बाहेर पडून जातात. वाफ घेताना पाण्यात ओवा किंवा विटामिन ई कँप्सूल मिक्स करून टाकावी. यामुळे नाक स्वच्छ होते आणि सर्दीपासून आराम मिळतो. सायन्स झाल्यानंतर सुद्धा खूप जास्त शिंका येतात. सतत येणाऱ्या शिंकामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे सायन्सच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी.
Ans: नाकात धूळ, परागकण किंवा इतर बाहेरील कण गेल्यावर.
Ans: शिंक रोखल्याने घसा दुखणे, आवाज बदलणे किंवा इतर समस्या होऊ शकतात, म्हणून शिंकू देणे चांगले.
Ans: ऍलर्जी किंवा क्रॉनिक रायनाइटिस चे लक्षण असू शकते.






