पोटात वाढलेली उष्णता क्षणार्धात होईल कमी! 'या' हिरव्यागार पानांच्या रसाचे नियमित करा सेवन,
जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते. स्वयंपाक घरातील पदार्थ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असतात. त्यातील अत्यंत गुणकारी पदार्थ म्हणजे कोथिंबीर. हिरवीगार कोथिंबीर चवीसोबतच आरोग्यासाठी शुद्ध अतिशय गुणकारी आहे. जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये कोथिंबीर वापरली जाते. बऱ्याचदा तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात उष्णता वाढणे, जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी किंवा पराठा बनवताना त्यात कोथिंबीर वापरली जाते. कोथिंबीर चवीला अतिशय सुंदर लागते आणि आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे.(फोटो सौजन्य – istock)
रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात
अतितिखट पदार्थांच्या सेवनामुळे पोटात उष्णता वाढू लागते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोथिंबीरीचे सेवन करावे. कोथिंबीर किंवा कोथिंबिरीचा रस प्यायल्यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होते. तसेच अपचन झाल्यामुळे छातीत जळजळ वाढण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय कोथिंबिरीचा रस प्यायल्यामुळे पोटाच्या समस्या, गॅस आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. शरीरात वाढलेले पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी कोथिंबीर खावी.
कोथिंबीर खाल्यामुळे आरोग्य सुधारते. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आढळून येतात. यासोबतच जीवनसत्त्वांमध्ये ए, सी, के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात. शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोथिंबिरीचा तस अतिशय प्रभावी ठरतो. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोथिंबीर अतिशय गुणकारी ठरते.
कोथिंबीर खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेले पित्त नियंत्रणात राहण्यास मदत होते. अपचन किंवा पित्ताच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात कोथिंबीर खावी. शरीरात आम्ल्पित्त वाढल्यानंतर उलट्या आणि पोटाचे विकार होते. हे विकार होऊ नये आहारात कोथिंबीरसोबतच थंड आणि पित्त कमी करणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
कोथिंबीरच्या बियांचे काय फायदे आहेत?
कोथिंबीरच्या बिया मसाल्यांमध्ये वापरल्या जातात आणि त्यांचे पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या, ऍसिडिटी आणि त्वचेच्या समस्यांवर आराम मिळतो, असे आरोग्य वेबसाइट्समध्ये म्हटले आहे.
कोथिंबीरचे पाणी कसे बनवायचे?
रात्री पाण्यात धणे भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
कोथिंबीरमध्ये कोणते पोषक तत्वे आढळतात?
कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटामिन सी आणि के भरपूर प्रमाणात असतात.