दातांमध्ये चिटकून राहिलेली घाणीचे कण स्वच्छ करण्यासाठी 'या' पावडरचा करा वापर,
दात खराब किंवा दात पिवळे होणे या अतिशय सामान्य समस्या आहे. दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर दात अस्वच्छ दिसू लागतात. सतत गुटखा, तंबाखू किंवा स्मोकिंग केल्यामुळे शरीरसोबतच दात सुद्धा खराब होऊन जातात. हल्ली प्रत्येक व्यक्ती दातांच्या समस्येने त्रस्त आहेत. दात पिवळे झाल्यानंतर किंवा तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्यानंतर मनमोकळेपणाने हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटू लागते. तसेच बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. दातांवर पिवळेपणा वाढण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत. दात व्यवस्थित स्वच्छ न कारणे, सतत गोड पदार्थांचे सेवन किंवा इतर अनेक कारणांमुळे दात खराब होऊन जातात.दातांना चिटकून राहिलेली घाण हळूहळू प्लाक आणि टार्टरमध्ये बदलते.(फोटो सौजन्य – istock)
दातांमध्ये वेदना वाढल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात.पण वारंवार पेनकिलर गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होते. त्यामुळे दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. दात पिवळे होणे, दात सडणे किंवा दातांमध्ये दुर्गंधी वाढल्यानंतर घरगुती उपाय करावे. आज आम्ही तुम्हाला दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर कसा करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर बेकिंग सोडा वापरावा. यामध्ये असलेले गुणधर्म दात मोत्यासारखे सुंदर करण्यासाठी मदत करतात. यामध्ये अल्कलाईन बॅक्टेरिया द्वारे बनवण्यात आलेले अॅसिड न्यूट्रलाइज आहे. दातांवर साचून राहिलेले प्लँक, टार्टर हळूहळू निघू जाण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरिअल दातांच्या संसर्गापासून बचाव करतात. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बेकिंग सोड्याचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करावा.
वाटीमध्ये एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडस पाणी टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट हातांच्या किंवा ब्रशच्या सहाय्याने हिरड्या आणि दातांवर घासून घ्या. यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होईल. दातांवर साचून राहिलेली घाण आणि प्लँक कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. दातांच्या फटींमध्ये साचलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा प्रभावी ठरतो. याशिवाय तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी बेकिंग सोडायचे पाणी बनवून गुळण्या करा. गुळण्या केल्यामुळे तोंडात वाढलेली घाण कमी होईल.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक ठरेल प्रभावी, चरबीचे टायर होतील गायब
बेकिंग सोडा दातांवर अजिबात लावू नये. यामुळे दाताच्या वरच्या थराचे नुकसान होऊ शकते. दात स्वच्छ करताना बेकिंग सोडा टूथपेस्टमध्ये अजिबात मिक्स करू नका. यामुळे जिभेला त्रास होऊ शकतो. दातांसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्याही चुकीच्या पदार्थाचा वापर करू नये.
दात किडणे म्हणजे काय?
दात किडणे म्हणजे दातांच्या भागावर पडणे. हे तोंडातील बॅक्टेरियामुळे होते.
दातांची काळजी कशी घ्यावी?
दिवसातून दोनदा फ्लोराईड-युक्त टूथपेस्ट आणि फ्लॉसने दात घासा.हिरड्यांच्या आरोग्यासाठी नियमित फ्लॉसिंग आवश्यक आहे.
तोंडी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?
भरपूर पाणी प्या, जंक फूड आणि साखरयुक्त पेये टाळा, संतुलित आहार घ्या.