Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेला चरबीचा थर होईल नष्ट! चहामध्ये टाका ‘हा’ जादुई पदार्थ, मधुमेह- वाढलेल्या वजनाची समस्या होईल कायमची गायब

सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी लवंग चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच वजन नियंत्रणात राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 19, 2025 | 05:30 AM
पोटावर वाढलेला चरबीचा थर होईल नष्ट! चहामध्ये टाका 'हा' जादुई पदा

पोटावर वाढलेला चरबीचा थर होईल नष्ट! चहामध्ये टाका 'हा' जादुई पदा

Follow Us
Close
Follow Us:

लवंग खाण्याचे फायदे?
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?
लवंग चहा बनवण्याची कृती?

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणामुळे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिण्याची तलप येते. आल्याचा चहा प्यायल्यामुळे घशाला सुद्धा शेक मिळतो आणि संपूर्ण शरीराला फायदे होतात. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली होत नाही. त्यामुळे सकाळी चहा बनवताना त्यात एक किंवा लवंग टाकावे. यामुळे चहाची चव वाढण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील. लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये लवंग घालून बनवलेल्या चहाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात लवंग घालून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

पचनक्रिया सुधारते:

पचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लवंग अतिशय प्रभावी ठरते. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात पचनास जड किंवा तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे गॅस, अपचन, पोटदुखी आणि ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास होतो. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग चहाचे सेवन करावे. लवंगचे पाणी किंवा नुसताच लवंग सुद्धा चघळू शकता. वारंवार होणाऱ्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी लवंग खावी.

महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर:

तोंडाच्या आरोग्यासाठी लवंग अतिशय प्रभावी ठरते.यामध्ये असलेले ‘युजेनॉल’ नावाचे एक नैसर्गिक घटक दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दातांमध्ये वाढलेल्या वेदना, कीड किंवा हिरड्यांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लवंग खावी. दातांमध्ये अतिशय तीव्र वेदना वाढू लागल्यास वेदना होत असलेल्या दाताला लवंग तेल लावावे. तसेच तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी जेवणानंतर लवंग चघळावा.

रोगप्रतिकारशक्ती सुधारते:

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लवंगचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर काढा पिण्याऐवजी लवंग आणि इतर आयुर्वेदिक पदार्थ टाकून बनवलेल्या चहाचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. याशिवाय लवंगाचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यासोबतच मधुमेह नियंत्रणात राहतो.

घशात साचून राहिलेला कोरडा कफ क्षणार्धात पडून जाईल बाहेर! एक चमचा मधात मिक्स करा ‘हा’ पिवळा पदार्थ, खोकला होईल कमी

लवंग चहा बनवण्याची कृती:

चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात लवंग घालून व्यवस्थित उकळवा. तयार केलेला चहा गाळून कोमट झाल्यानंतर त्यात मध मिक्स करून प्यावा. यामुळे पोटातील घाण बाहेर पडून जाईल आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The layer of fat accumulated on your belly will disappear add this magical ingredient to your tea home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • diabetes
  • home remedies
  • Weight loss

संबंधित बातम्या

टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! ‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर
1

टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! ‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर

चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब
2

चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब

कोणत्याही वेदनेशिवाय सहज निघून येतील शरीरावरील अनावश्यक केस! वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसापासून बनवा घरगुती वॅक्स
3

कोणत्याही वेदनेशिवाय सहज निघून येतील शरीरावरील अनावश्यक केस! वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसापासून बनवा घरगुती वॅक्स

सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल
4

सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.