Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; नेमकं कारण काय?

इंडियन स्ट्रोक असोसिएशननुसार भारतात दरवर्षी सुमारे १५ लाख नवीन स्ट्रोकच्या (पक्षाघात) रुग्णांची संख्या नोंदवली जाते. त्यामुळे ‘स्ट्रोक’ हे मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाचे प्रमुख कारण ठरत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 22, 2025 | 04:54 PM
हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; नेमकं कारण काय?

हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; नेमकं कारण काय?

Follow Us
Follow Us:
  • हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
  • दरवर्षी १५ लाख नवीन स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या
  • नेमकं कारण काय?
इंडियन स्ट्रोक असोसिएशननुसार भारतात दरवर्षी सुमारे १५ लाख नवीन स्ट्रोकच्या (पक्षाघात) रुग्णांची संख्या नोंदवली जाते. त्यामुळे ‘स्ट्रोक’ हे मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाचे प्रमुख कारण ठरत आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल (एबीएमएच), पुणे येथील डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यामागे पर्यावरणीय घटक, शारीरिक हालचालींमध्ये झालेली घट, शरीरातील पाण्याची कमतरता, हंगामी होणारा संसर्ग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे नियंत्रण बिघडणे ही कारणे आहेत.

हिवाळ्यात हा धोका का वाढतो याबाबत माहिती देताना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे न्यूरोसायन्सेस व न्यूरोसर्जन विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. राकेश रंजन म्हणाले, “गेल्या एका आठवड्यात दररोज सुमारे एक ते दोन स्ट्रोकचे रुग्ण आढळून येत आहेत. हिवाळ्यात तापमान घटल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. तसेच थंड हवामानामुळे रक्त घट्ट होते, त्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता वाढते. यामुळे प्रामुख्याने इस्केमिक स्ट्रोक (मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह अचानक अडथळा आल्यामुळे होणारा पक्षाघात) होतो. त्याचे प्रमुख कारण मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह अडथळा हे आहे. दुसरा प्रकार म्हणजे हेमोरेजिक स्ट्रोक, जो मेंदुतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे होतो आणि यामागे बहुतेक वेळा अनियंत्रित उच्च रक्तदाब कारणीभूत असतो.”

स्ट्रोकची सामान्य लक्षणे म्हणजे अचानक चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे, हात किंवा पायात ताकद कमी होणे किंवा बधिरपणा येणे, बोलण्यात अडचण येणे, अस्पष्ट किंवा दुहेरी दिसणे (दोन व्यक्ती/ वस्तु दिसणे), चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी किंवा तोल जाणे होय. डॉ. रंजन यांनी स्पष्ट केले की लक्षणे सुरू झाल्यानंतर पहिल्या चार ते साडेचार तासांचा ‘गोल्डन अवर’ (सुवर्ण तास) अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात योग्य वेळी उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते आणि दीर्घकालीन होऊ शकणारे नुकसान कमी करता येते.

स्ट्रोकच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत बोलताना डॉ. रंजन म्हणाले, “महत्त्वाच्या उपचार कालावधीत स्ट्रोकची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.’’ आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल हे स्ट्रोक-रेडी सेंटर म्हणून कार्यरत असून येथे समर्पित स्ट्रोक व न्यूरो फिजिशियन, चोवीस तास न्यूरोसर्जिकल सेवा तसेच सीटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या प्रगत निदान सुविधा उपलब्ध आहेत. विशेष न्यूरो आयसीयू तसेच सर्वांगीण फिजिओथेरपी व पुनर्वसन कार्यक्रम रुग्णांना जलद पुनर्प्राप्तीसाठी मदत करतात. रुग्णालयात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्ट्रोक उपचार प्रोटोकॉलनुसार ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ स्ट्रोक स्केल’ या एक मानक वैद्यकीय चाचणी (NIHSS) चे पालन केले जाते. त्यामुळे जलद मूल्यांकन, वेळेवर तपासण्या आणि तात्काळ उपचार शक्य होतात.

हिवाळ्यातील अतिरिक्त जोखीम घटक आणि जीवनशैलीविषयक बाबी

डॉ. रंजन यांनी हिवाळ्यातील निर्जलीकरणाकडेही लक्ष वेधले. हे अनेकदा दुर्लक्षित राहते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्त अधिक घट्ट होते आणि रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान, मद्यसेवन तसेच अनियंत्रित मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे घटक हिवाळ्यात स्ट्रोकचा धोका अधिक वाढवतात. तापमानात अचानक घट झाल्यास शरीरात शारीरिक प्रतिक्रिया निर्माण होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदय व मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. हंगामी फ्लू आणि इतर संसर्गांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि दाहक प्रतिक्रिया वाढू शकतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो.

या जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी पुरेसे पाणी पिणे, घरात हलका व्यायाम करणे, रक्तदाब आणि साखरेची पातळी नियमित तपासणे तसेच हिवाळ्यात शिफारस केलेली लसीकरणे घेण्याचा सल्ला दिला. हे संसर्ग टाळण्यास मदत करतात आणि त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.

हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना, योग्यवेळी जागरूकता, त्वरित प्रतिसाद आणि विशेष स्ट्रोक उपचारांची उपलब्धताही बरे होणे आणि दीर्घकालीन अपंगत्व यामध्ये निर्णायक ठरू शकतो.

Web Title: The number of stroke patients is increasing in winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • Doctor
  • maharashtra
  • Winter News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.