Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Konkan Railway News Marathi : नागोठणे परिसरातील तांत्रिक बिघाडामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली. कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल ५ तास ४० मिनिटे उशिराने मुंबईत पोहोचली, तर मुंबई–मडगाव आणि मडगाव–मुंबई मांडवी एक्सप्रेसलाही मोठा विलंब झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2026 | 06:16 PM
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Follow Us
Follow Us:
  • कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले!
  • कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
  • अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारी (2 जुलै 2026) पुन्हा एकदा विस्कळीत झाली. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात पहाटे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या बिघाडामुळे आधीच सुमारे तीन तास उशिराने धावणारी २०११२ कोकणकन्या एक्सप्रेस आणखी दोन तास रखडली आणि अखेर ती तब्बल ५ तास ४० मिनिटे उशिराने मुंबईत दाखल झाली.

कोकणकन्या एक्सप्रेसच्या विलंबाचा थेट परिणाम मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या १०१०३ मुंबई–मडगाव मांडवी एक्सप्रेसवर झाला. ही गाडीही सहा तासांहून अधिक उशिराने धावत असल्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांच्या पुढील प्रवासाचे नियोजनही विस्कळीत झाले.

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

याशिवाय, स्वतंत्र तांत्रिक कारणामुळे १०१०४ मडगाव–मुंबई मांडवी एक्सप्रेसही किमान अडीच तास उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही दिशांमधील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, या विलंबामागे मुसळधार पाऊस, दरड कोसळणे किंवा इतर नैसर्गिक अडथळे कारणीभूत नसून तांत्रिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून रेल्वे प्रशासनाकडून अधिक प्रभावी नियोजनाची मागणी होत आहे.

रेल्वे अभ्यासकांच्या मते, कोकण रेल्वेने पुरेशी क्षमता आणि वेळेचे नियोजन नसतानाही कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा दिल्यामुळे वेळापत्रकावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकणकन्या आणि मांडवी या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांवर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणकन्या एक्सप्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द करणे किंवा मडगावहून मुंबईकडे येणारी कोकणकन्या एक्सप्रेस किमान एक तास लवकर सोडणे, हेच तातडीचे उपाय असल्याची मागणी प्रवासी आणि रेल्वे जाणकारांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन कोकण रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील मर्यादित क्षमता आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. मात्र, पुरेशी क्षमता आणि वेळेचे नियोजन नसतानाही कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात आल्याने वेळापत्रकावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. परिणामी कोकणकन्या आणि मांडवीसारख्या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये वारंवार विलंब होत असल्याचे ते सांगतात. सध्या तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम पूर्ण झाले असले तरी दिवसभर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच रेल्वे स्थानकावर जाण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा

Web Title: Konkan railway delay konkankanya mandovi express nagothane technical fault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • central railway
  • konkan railway
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.