Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये ऐनवेळी बदल झाल्याने उरण पोलीस ठाण्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. प्रारंभी पृथ्वीराज घोरपडे यांची उरण येथे नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नंतर आदेशात बदल करून जगदीश शेलकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 07:00 PM
नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट!
  • उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती
  • निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
सावन वैश्य | नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये एका महत्त्वाच्या निर्णयात बदल झाल्याने पोलीस वर्तुळासह उरण परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रारंभी जारी करण्यात आलेल्या बदली आदेशानुसार गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांची उरण पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या आदेशात बदल करण्यात आला असून जगदीश शेलकर यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर पृथ्वीराज घोरपडे यांची पुन्हा गुन्हे शाखेतच नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या बदलामुळे पोलीस विभागात तसेच उरणमधील नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. घोरपडे यांच्या उरण येथील नियुक्तीचा आदेश जारी होऊनही त्याची अंमलबजावणी का झाली नाही, तसेच त्याऐवजी शेलकर यांची नियुक्ती करण्यामागील नेमके प्रशासकीय कारण काय होते, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

APMC Police Action : एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई; वेश्याव्यवसायाविरोधात मोहीम, अतिक्रमणावरही संयुक्त कारवाई

दरम्यान, या निर्णयामागे राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा काही स्तरावर सुरू असली, तरी या दाव्याला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या बदलामागील वस्तुस्थिती काय, याबाबत स्पष्टता आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. काहींनी विशिष्ट राजकीय नेत्यांच्या पसंतीचा अधिकारी संबंधित पोलीस ठाण्यात असावा, अशी इच्छा असल्याने बदली आदेशात बदल झाल्याची चर्चा व्यक्त केली आहे. मात्र, या चर्चांना कोणताही अधिकृत आधार उपलब्ध नसल्याने त्याबाबत प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या केवळ प्रशासकीय गरज, कार्यकाळ आणि पारदर्शक निकषांच्या आधारे व्हाव्यात. कार्यक्षम व प्रामाणिक अधिकाऱ्यांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास त्याचा थेट फायदा कायदा व सुव्यवस्था राखण्यास होऊ शकतो.

विशेष म्हणजे, या बदली प्रक्रियेदरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देऊन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल झाले असून त्याच पार्श्वभूमीवर उरण पोलीस ठाण्याच्या नियुक्तीतील बदलाची विशेष चर्चा रंगत आहे. दरम्यान, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जगदीश शेलकर कार्यरत झाले आहे.

रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी

Web Title: Uran police station senior inspector transfer prithviraj ghorpade jagdish shelkar navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर
1

Navi Mumbai News : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
2

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

जूनमध्ये बंपर GST कलेक्शन, आकडा 1.94 लाख कोटींवर; महाराष्ट्र पुन्हा अव्वल स्थानी, आता वस्तू स्वस्त होतील की  महागाई वाढेल?
3

जूनमध्ये बंपर GST कलेक्शन, आकडा 1.94 लाख कोटींवर; महाराष्ट्र पुन्हा अव्वल स्थानी, आता वस्तू स्वस्त होतील की महागाई वाढेल?

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ
4

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.