Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात पोटाला मिळेल थंडावा! शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट बनवा कोकोनट राईस, नोट करून घ्या पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोकोनट राईस बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 29, 2026 | 11:11 AM
उन्हाळ्यात पोटाला मिळेल थंडावा! शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट बनवा कोकोनट राईस, नोट करून घ्या पदार्थ

उन्हाळ्यात पोटाला मिळेल थंडावा! शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट बनवा कोकोनट राईस, नोट करून घ्या पदार्थ

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये थंड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. थंड पदार्थांच्या सेवनामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात भात शिल्लक राहिल्यानंतर तो तसाच ठेवून दिला जातो. पण बऱ्याचदा शिल्लक राहिलेल्या भातापासून नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भातापासून कोकोनट राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोकोनट राईस खाल्ल्यामुळे पोटात थंडावा कायम टिकून राहील. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावे सुचत नाही. अशावेळी कोकोनट राईस उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये झटपट बनवा कैरीचा सार, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • भात
  • खोबऱ्याचा किस
  • मोहरी
  • हिंग
  • कढीपत्ता
  • जिरं
  • काजू
  • लाल मिरच्या
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • उडीद डाळ
  • साखर
  • मीठ
Ram Navami : राम नवमी निमित्त खास प्रसाद, झटपट घरी तयार करा स्वादिष्ट रव्याचा शिरा

कृती:

  • कोकोनट राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, भात शिजवून मोकळा करून घ्या किंवा शिल्लक राहिलेला भात थोडासा गरम करा.
  • कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्याची पाने घालून फोडणी भाजा.
  • फोडणी भाजल्यानंतर त्यात शेंगदाणे, काजू, लाल मिरच्या, उडीद डाळ खमंग भाजून घ्या. यामुळे भाताला चव सुंदर लागेल.
  • त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट टाकून भाजा आणि वरून ओल्या खोबऱ्याचा किस घालून मिक्स करा.
  • सर्व साहित्य मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात शिजवलेला भात घालून मिक्स करा.
  • व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कोकोनट राईस. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

Web Title: The stomach will get cool in summer instantly make coconut rice from leftover rice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
1

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
2

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.