100 वर्ष जगायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या 5 बियांचा समावेश करा; याचे सेवन शरीरासाठी कोणत्या चमत्काराहून कमी नाही
आजकालच्या व्यस्त आणि घाईगडबडीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेणं विसरुन गेले आहेत. चुकीचा आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे अनेक लोक कमी वयातच निरनिराळ्या आजारांना बळी पडतात. कर्करोग, हृदयविकार, हाय कोलेस्ट्राॅल हे तर आताच्या काळातील सामान्य आजार झाले आहेत. हेच कारण आहे की, आताच्या युगात लोकांना दिर्घकाळ जगता येत नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो की, योग्य आहार आणि जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करुन तुम्ही तुमचे आयुष्य आणखीन वाढवू शकता. अमेरिकेतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. पाल माणिकम यांच्या मते, काही बिया मानवी आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत. डॉ. पाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर अशा ५ बियांबद्दल सांगितले आहे, ज्यांचे नियमित सेवन आरोग्यासाठी प्रचंड फायदेकारक आहे. आपल्या रोजच्या आहारात या बियांचा समावेश करुन तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
भोपळ्याच्या बिया
डॉ. पाल यांच्या मते , भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण खूप जास्त असते. मूठभर भोपळ्याच्या बिया दररोजच्या सेवनाच्या अंदाजे ३७ टक्के प्रमाणात पुरवतात. मॅग्नेशियम स्नायूंना आराम मिळवून देतो आणि हृदयाती रिदम योग्य करतो. त्यात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड असते जे झोपेला रेगुलेट करणाऱ्या हार्मोंन्समध्ये रुपांतरीत होते. यामुळेच ज्या लोकांना निद्रानाश, ताण आणि थकवा जाणवतो त्यांनी भोपळ्याच्या बियांचा आहारात आवर्जून समावेश करावा.
चिया सिड्स
लठ्ठपणाची समस्या असणाऱ्यांसाठी चिया सिड्स फायदेशीर आहेत. वजन कमी करण्यासाठी या बियांची फार मदत होते. पाण्यात किंवा दुधात मिसळून त्यांना खाल्ले जाते. यामध्ये सॉल्यूबल फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनशक्ती वाढवण्यास आणि अधिक काळापर्यंत पोट भरुन ठेवण्यास मदत करते. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड देखील आहे, जे मेंदूचे आणि हृदयाचे आरोग्या तंदूरुस्त ठेवण्यास मदत करते. पोटात जळजळ निर्माण होणे, गॅस होणे अशा समस्यांना मात करण्यासाठी चिया सिड्सचे सेवन एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही ते स्मूदी, ओटमील, दही या सर्वांमध्ये मिसळून चिया सिड्सचे सेवन करु शकता.
जवसाच्या बियांमध्ये
जवसाच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यात लिग्नान्स नावाचे प्लांट कम्पाउंड असते, तसेच अँटिऑक्सिडंट्स आणि इस्ट्रोजेनिक गुणधर्म असतात. यातील पोषक घटक पचनसंस्थेला चालना देण्यास आणि कोलेस्ट्राॅलची पातळी कमी करण्यास मदत करते. जवसाच्या बिया खाताना, त्यांना मिक्सरमध्ये बारीक करा, कारण संपूर्ण बिया सहज शोषल्या जात नाहीत. ते स्मूदी, दही इत्यादींमध्ये घातले जाऊ शकते. तुम्ही जवसाच्या बियांची घरी चटणी देखील तयार करु शकता.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये
व्हिटॅमिन ई आणि सेलेनियमने युक्त सूर्यफुलाच्या बिया शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि थायरॉईड सुरळीत ठेवण्यास मदत करते. यात असलेले व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि थायरॉईडचे कार्य राखते. व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते. तुम्ही ते कच्चे किंवा हलके भाजून खाऊ शकता. तसेच सॅलड, भाज्या, स्मूदी, लस्सी, स्प्रेड आणि डिप्समध्ये घालूनही याचे सेवन करता येते.
अर्ध्या लिंबूच्या मदतीने साफ करा मानेवरचा काळा थर; फक्त 15 मिनिटांतच दिसून येईल फरक
तीळ
तीळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. यात काही हेल्दी फॅट्स असतात जे जळजळ कमी करतात आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. तुम्ही भाज्यांमध्ये, स्मूदीमध्ये किंवा सॅलडमध्ये मिक्स करुन याचे सेवन करु शकता. तिळाचे लाडूही फार चविष्ट लागतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.