मानेवर जमा झालेला काळेपणाचा चिकट थर काढून टाकण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे सतत घाम येऊ लागतो. घामामुळे संपूर्ण शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे. पाण्यासोबतच आहारात नारळ पाणी, थंड पेय, कोकम सरबत किंवा लिंबू पाण्याचे सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. घामामुळे शरीराच्या काही अवयवांमध्ये घाम तसाच साचून राहतो. यामुळे बऱ्याचदा काखेत किंवा मानेवर काळेपणाचा चिकट थर जमा होण्याची शक्यता असते. मानेवर साचून राहिलेल्या चिकट थरामुळे संपूर्ण मान काळी होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळी झालेली मान स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे मानेवरील काळेपणाचा चिकट थर कमी होऊन मान स्वच्छ होईल.(फोटो सौजन्य – iStock)
बेकिंग सोड्यात असलेले गुणधर्म शरीरावर चिकट राहिलेला काळेपणा कमी करण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्या. बेकिंग सोडा त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतो. बेकिंग सोड्याचे मिश्रण मानेवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर जमा झालेल्या काळेपणा वर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर मान पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास मानेवर साचून राहिलेला काळेपणा कमी होईल आणि तुमची मान चमकदार दिसू लागेल.
हळदीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग काढून टाकण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचेवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी बेसनाचा लेप नियमित मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. यासाठी वाटीमध्ये बेसन आणि हळद घेऊन त्यात थोडेसे पाणी किंवा गुलाब पाणी टाकून मिक्स करा. तयार केलेला लेप संपूर्ण मानेवर किंवा शरीराच्या इतर भागांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पाण्याने लेप स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास मान स्वच्छ होईल आणि मानेवरील काळेपणा कमी होईल.
कच्च्या दुधात असलेले गुणधर्म मानेवर जमा झालेले बॅक्टरीया कमी करण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीमध्ये कच्चे दूध घेऊन कापसाच्या सहाय्याने मानेवर लावून घ्या. त्यानंतर काहीवेळा तसेच ठेवा. नंतर पाण्याने मन स्वच्छ धुवून घ्या. कच्चे दूध त्वचेला पोषण देते. याशिवाय त्वचा नैसर्गिकरित्या उजळदार करण्यासाठी मदत करते.