दीर्घायुष्यासाठी दैनंदिन आहारात अजिबात करू नका 'या' विषारी पदार्थांचे सेवन
निरोगी आरोग्यासाठी सगळेच सतत काहींना काही करत असतात. मात्र बऱ्याचदा चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. कामाचा तणाव, शरीरात सतत होणारे बदल, अपुरी झोप, चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे मधुमेह, कर्करोग, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला दीर्घायुष्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात ‘या’ मसाल्यांचे सेवन करणे टाळा; चव घ्यायच्या नादात आरोग्य होईल खराब
दैनंदिन आहारात साखरेचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात साखर खावी. साखर खाल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते.साखर खाल्यामुळे कॅन्सर, हृदयविकार किंवा डायबेटीस इत्यादी गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात साखर, बटर, पाम तेल इत्यादी अनेक पदार्थांचे सेवन करणे टाळावे. साखरेचे पदार्थ खाल्यामुळे शरीरात विष जमा होण्याची शक्यता असते.
निरोगी आरोग्यासाठी नियमित शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम करणे, शारीरिक कसरती, योगासने, प्राणायाम इत्यादी गोष्टी नियमित केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय घरातील साधी काम केल्यानंतर सुद्धा शारीरिक हालचाली होतात. योगासने किंवा प्राणायाम केल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, मूड प्रसन्न राहतो, हाडे बळकट होतात आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
मुळांपासून कायमचा नष्ट होईल जुनाट मुळव्याध! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, पोट वाटेल हलके
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी दैनंदिन आहारात चुकीच्या पदार्थांचे सेवन न करता शरीराला पचन होण्याऱ्या आणि हलक्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित प्राणायाम, योगासने, ध्यान इत्यादी गोष्टी नियमित केल्यास बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारून शरीराला अनेक फायदे होतात. योग्य जीवनशैली, झोपेची गुणवत्ता सुधारते इत्यादी अनेक गोष्टींमध्ये बदल होऊ लागतात.