Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ त्वचेसाठी ठरतील वरदान! पिंपल्स, मुरूम होतील कायमचे गायब

त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण राहते आणि सुंदर दिसते. त्वचेवरील नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यासाठी हे घरगुती पदार्थ वापरावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2025 | 02:45 PM
स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ त्वचेसाठी ठरतील वरदान!

स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ त्वचेसाठी ठरतील वरदान!

Follow Us
Follow Us:

लहान मुलींपासून ते अगदी म्हतारपणात सुद्धा त्वचेवर मोठ्या प्रमाणात पिंपल्स आणि त्वचेसंबंधित इतर समस्या उद्भवतात. त्वचा कायमच तरुण आणि तेजस्वी राहावी असे प्रत्येक महिलेला नेहमीच वाटते. त्वचा सुंदर आणि गोरीपान करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र आहारात होणारे बदल, मासिक पाळी, हार्मोनल बदल, धूळ, प्रदूषणामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. त्वचेवर आलेले पिंपल्स महिला नखांनी किंवा टोकदार वस्तूचा वापर करून फोडतात. मात्र यामुळे त्वचेवरील पिंपल्स आणखीनच वाढतात, ज्यामुळे त्वचा खराब होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महागड्या क्रीम किंवा स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. हे स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेची गुणवत्ता सुधरण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)

ॲक्ने, पिगमेंटेशनमुळे त्वचा खराब झाली असेल तर ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, जावेद हबीबने सांगितलेला सोपा उपाय

त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत केमिकल प्रॉडक्ट किंवा हानिकारक रसायनांचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि उठावदार दिसते. त्वचेची चमक वाढवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. हे पदार्थ नियमित वापरल्यास महिनाभरात फरक दिसून येईल.

लिंबाचा रस:

प्रत्येक घरात लिंबू असतोच. जेवणातील पदार्थ बनवताना किंवा सरबत बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबूच्या रसात असलेले घटक त्वचेवर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात बेसन टाकून मिक्स करावे. त्यानंतर तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावून काहीवेळ ठेवून त्वचानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला लालसरपणा, जळजळ आणि त्वचेवर वाढलेले डाग कमी होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा:

भजी किंवा पुरी बनवताना बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. तसाच वापर तुम्ही त्वचेसाठी सुद्धा करू शकता. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तसेच मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात तुम्ही लिंबाचा रस टाकून मिक्स करू शकता. यामुळे त्वचेचा कोरडेपणा, जळजळ आणि मुरूम कमी होण्यास मदत होते.

पावसाळ्यात केसगळती थांबवण्यासाठी ‘या’ औषधी तेलाचा करा वापर, जाणून घ्या केसांना तेल लावण्याची सोपी पद्धत

बटाटा:

अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय प्रभावी ठरतो. यासाठी वाटीमध्ये किसलेल्या बटाट्याचा रस घेऊन नंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. १० मिनिटानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ आणि लालसरपणा कमी होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These items in the kitchen will be a boon for the skin pimples pimples will disappear forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
1

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

केस होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ नैसर्गिक पदार्थ, महिनाभरात केसांची होतील झपाट्याने वाढ
2

केस होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ नैसर्गिक पदार्थ, महिनाभरात केसांची होतील झपाट्याने वाढ

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा
3

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा

पावसाळ्यात केस राहतील मुलायम आणि सॉफ्ट! जास्वदींच्या फुलांपासून घरी तयार करा नॅचरल हेअर मास्क,  केसांना मिळेल भरपूर पोषण
4

पावसाळ्यात केस राहतील मुलायम आणि सॉफ्ट! जास्वदींच्या फुलांपासून घरी तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांना मिळेल भरपूर पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.