ॲक्ने, पिगमेंटेशनमुळे त्वचा खराब झाली असेल तर 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर
सुंदर आणि ग्लोइंग स्किनसाठी सर्वच महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल केले जाते तर कधी क्लीनअप करून त्वचा चमकदार करतात. पण यामुळे काहीवेळा पुरताच त्वचा ग्लो येतो. पण काही दिवसांनंतर त्वचा होती तशीच होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर धूळ, माती किंवा चिकटपणामुळे त्वचेवर पिंपल्स, ऍक्ने किंवा फोड येण्याची शक्यता असते. हे पिंपल्स वाढल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज दिसू लागते. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारातील फेस सीरम किंवा फेसपॅक लावतात. पण नेहमीच केमिकल प्रॉडक्ट लावून त्वचेची काळजी घेण्यापेक्षा घरगुती उपाय करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. आज आम्ही तुम्हाला पिंपल्स,ऍक्ने आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी जावेद हबीबने सांगितलेला घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो कायमच टिकून राहतो आणि त्वचा डागविरहित दिसू लागते. घरगुती उपाय त्वचा कायमच सुंदर ठेवतात.
स्किन केअर रुटीन फॉलो करताना त्यामध्ये तुरटीचा वापर करावा. तुरटी त्वचेवर वाढलेले फोड किंवा पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करते. तुरटीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले डाग, काळसरपणा, ॲक्ने कमी करतात. तुरटी वापरल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मद्य होते आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. यासाठी वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात दही टाकून मिक्स करा. तयार केलेला लेप संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास त्वचा अतिशय सुंदर होईल.
चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, त्वचेचे होईल गंभीर नुकसान
त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी दही अतिशय महत्वाचे आहे. दह्यामध्ये असलेले लॅक्टीक ॲसिड त्वचेवर वाढलेली डेड स्किन कमी करण्यासाठी मदत करते. तसेच त्वचा स्वच्छ होते. दह्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे त्वचा फ्रेश आणि टवटवीत दिसते. तुरटीचा लेप नियमित त्वचा स्वच्छ होते. त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन घालवण्यासाठी तुरटीचा वापर करावा.