
नॉनव्हेज खाताना केलेल्या 'या' चुकांमुळे वाढतो पोटाच्या कॅन्सरचा धोका
आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कशामुळे वाढतो?
नॉनव्हेज पदार्थ खाताना कोणती काळजी घ्यावी?
नॉनव्हेज पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होते?
प्रत्येकाला चिकन, मटण, मासे, अंडी इत्यादी पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. सुट्टीच्या दिवशी प्रत्येक घरात मांसाहारी पदार्थ बनवले जातात. पण मांसाहार, ग्रिल पदार्थ, पॅकेज्ड फूड आणि बाहेरील जेवणाचे सेवन केल्यामुळे आतड्यांसोबत पोटाचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अतितिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.याशिवाय सतत मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात जळजळ, ऍसिडिटी, लठ्ठपणा, गॅस इत्यादी पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. बिघडलेल्या पचनक्रियेमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात आणि भूक पूर्णपणे मंदावते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात दिसणाऱ्या लहान लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. मात्र कालांतराने हेच आजार गंभीर स्वरूप घेतात आणि शरीराचे नुकसान करतात. सतत चिकन, मटण आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या पेशींना हानी पोहचते. तसेच आहारात लाल मांसाचे जास्त सेवन करू नये. कारण हा पदार्थ व्यवस्थित न शिजल्यास आतड्यांचे नुकसान होते आणि पोटाचा किंवा आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नॉनव्हेज पदार्थ खाताना केलेल्या कोणत्या चुका शरीरासाठी अतिशय घातक ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उच्च तापमानावर लाल मांस किंवा चिकन, मटण शिजवल्यास ते व्यवस्थित शिजले जात नाही. याशिवाय पदार्थामध्ये हानिकारक रसायन तयार होतात. कच्चे मांस खाल्ल्यास शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. अर्धवट शिजवलेले चिकन किंवा लाल मांसात धोकायदाक विषाणू तयार होतात. हे विषाणू पोटात गेल्यानंतर शरीरातील अतिशय नाजूक पेशींचे नुकसान करतात. वर्षानुवर्षे संसर्ग पोटात तसाच राहिल्यामुळे कालांतराने कोणत्याही गंभीर आजाराची लागण शरीराला होते. त्यामुळे घाईगडबडीमध्ये चिकन, मटण शिजवू नये.
वारंवार आहारात लाल मांस खाल्ल्यामुळे हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग होऊ शकतो. हा आजार संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतो. पोटात तयार झालेल्या सूक्ष्मजंतूमुळे पोटातील आतड्यांच्या आवरणाला हानी पोहचते. दूषित मांस किंवा पाणी शरीरात गेल्यानंतर आतड्यांच्या चिंधा होण्याची शक्यता असते. याशिवाय पोटाच्या आतील भागाला सूज येऊन गंभीर नुकसान होते. भारतात पोटाच्या कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. चुकीचा आहार, जीवनशैलीतील बदलांचा परिणाम शरीरावर झाल्यामुळे गंभीर समस्या उद्भवू लागतात.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय भरपूर पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. आहारात फळे, भाज्या आणि सुका मेवा खाल्ल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. तसेच चिकन, मटण किंवा लाल मांस बनवताना ते व्यवस्थित शिजवून घ्यावे.
Ans: पोटाचा कर्करोग, ज्याला 'गॅस्ट्रिक कॅन्सर' असेही म्हणतात, हा पोटाच्या अस्तरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा कर्करोग आहे.
Ans: जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे.
Ans: कर्करोग किती लवकर निदान झाला यावर हे अवलंबून असते. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास बरा होण्याची शक्यता जास्त असते.