या' व्यक्तींनी चुकूनही करू नका कलिंगडचे सेवन!
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या कडाक्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी रोजच्या आहारात ताक, दही, कोकम सरबत, लस्सी इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. यासोबतच आहारात फळे, भाज्या आणि इतर कॅल्शियम युक्त पदार्थ खाल्ले जातात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात सगळीकडे कलिंगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कलिंगड खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये 90 टक्के पाणी असते, त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर सहज पचन होते.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही लोकांच्या आरोग्यासाठी कलिंगड अतिशय घातक ठरते. कलिंगड खाल्यानंतर पचनसंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कलिंगड खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? कोणत्या लोकांनी आहारात कलिंगड खाऊ नये? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
उन्हाळ्यात शरीरातून सतत घाम निघून गेल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात निर्माण झालेला थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी कलिंगडचे सेवन करावे. कलिंगड खाल्यामुळे शरीरात पाण्याची पातळी वाढते. याशिवाय यामध्ये विटामिन सी, बी 6 आणि अॅमिनो अॅसिड इत्यादी घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात कलिंगडाचे सेवन करावे. कलिंगड खाल्यामुळे शरीराचे कार्य सुधारते. याशिवाय यामध्ये असलेले पोटॅशियम आणि अॅमिनो अॅसिड्स हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करते. शरीरात वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी कलिंगड किंवा कलिंगडच्या रसाचे सेवन करावे. हायपरटेन्शनच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी कलिंगड खावे.
अनेकांना जेवल्यानंतर फळे खाण्याची सवय असते. पण जेवणानंतर चुकूनही कलिंगडचे सेवन करू नये. कलिंगड कधीही जेवण्याच्या आधी खावा. अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर कलिंगड खाल्यास शरीराची पचनक्रिया बिघडते आणि शरीरात आम्ल्पित तयार होते. त्यामुळे कोणत्याही वेळी कलिंगड खाऊ नये. हवामानातील बदल, सर्दी, खोकला आणि इतर समस्यांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी कलिंगड खाऊ नये. यामुळे सर्दी खोकला आणखीनच वाढू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड योग्य वेळी खावे.