ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. याशिवाय शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात. शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. २०० पेक्षा जास्त कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. कॅन्सर होण्यामागे अनेक कारण आहेत. चुकीचा आहार, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, व्यायामाची कमतरता इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीची जीवनशैली फॉलो न करता शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
तोंडाच्या कॅन्सरचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील प्रामुख्याने उद्भवणारा कॅन्सर म्हणजे ओठांचा कॅन्सर. ओठांचे आरोग्य बिघडल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा ओठांचे आरोग्य बिघडू शकते. ओठांचा कॅन्सर ओठांच्या खालील बाजूला होण्याची शक्यता असते. या आजाराची लागण झाल्यानंतर ओठांमध्ये कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात, ज्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र अनेक लोक या आजाराकडे दुर्लक्ष करतात.
ओठांचा कॅन्सर होण्यामागे अनेक गोष्टी जबाबदार आहेत. धूम्रपान, तंबाखू चघळणे, मद्यपान आणि सूर्याची अतिनील किरणे, सूर्य किरणांच्या जास्त संपर्कात आल्यामुळे ओठांचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. मात्र शरीरात सुरुवातीला दिसणाऱ्या लक्षणांमध्ये दुर्लक्ष केल्यामुळे ही गंभीर समस्या उद्भवू लागते. आज आम्ही तुम्हाला ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
ओठांचा कॅन्सर होऊ नये म्हणून सूर्याच्या अतिनील किरणांमध्ये जाणे टाळावे यामुळे ओठांच्या त्वचेक कोणतीही हानी पापोहचणर नाही. याशिवाय तंबाखू आणि मद्यपान अतिप्रमाणात केल्यामुळे ओठांचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन, लिप बाम आणि टोपी इत्यादी गोष्टी घालूनच बाहेर जावे. अन्यथा ओठांच्या आरोग्याचे नुकसान होईल.