या व्यक्तींनी चुकूनही करू नका हळदीच्या दुधाचे सेवन
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. हळदीचे सेवन रोजच्या आहारात केले जाते. हळदीचा वापर जेवणात केल्यामुळे पदार्थांचा रंग आणि सुंगंध वाढण्यास मदत होते. हळदीचा पिवळा रंग आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात हळदीचे सेवन करावे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी हळदीच्या दुधाचे सेवन केले जाते. हळदीचे दूध प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. नैसर्गिक पेय म्हणून हळदीच्या दुधाचे सेवन केले जाते. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद आरोग्य आणि त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करते. हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हळदीचे दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे सर्दी खोकला आणि साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. ज्याचा आरोग्याला फायदा होतो. पण काहींच्या आरोग्यासाठी हळदीचे दूध हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात हळदीचे दूध पिऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हळदीचे दूध शरीरासाठी गरम असल्यामुळे गर्भधारणेच्या दिवसांमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन करू नये. हळदीचे दूध प्यायल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हळदीच्या दुधाचे सेवन करू नये. चुकूनही हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास पोटदुखी, भिती वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हळदीचे दूध पिऊ नये. दुधामध्ये जास्त हळद घालून प्यायल्यास रॅश, जळजळ इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
पोटासंबंधित समस्या असलेल्या लोकांनी आहारात चुकूनही हळदीच्या दुधाचे सेवन करू नये. यामुळे तुमच्या गट हेल्थवर परिणाम होऊ शकतो, शिवाय पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसेच अतिप्रमाणात हळद टाकून दूध प्यायल्यास उलटी, मळमळ इत्यादी समस्या उद्भवून आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे कमीत कमी हळदीचे सेवन करावे.
या व्यक्तींनी चुकूनही करू नका हळदीच्या दुधाचे सेवन
ज्या व्यक्तींना यकृतासंबंधित समस्या उद्भवत असतील अशांनी हळदीच्या दुधाचे सेवन करू नये. यामुळे तुमचा त्रास अधिक वाढू शकतो. हळदीचे सेवन केल्यामुळे शरीराला आयन ची कमतरता भासत नाही. पण कोणत्याही पदार्थांच्या अतिसेवनामुळे आरोग्य बिघडते त्यामुळे कोणतेही पदार्थ खाताना ते योग्य प्रमाणात खावेत.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हळदीचे सेवन केल्यामुळे ज्या व्यक्तींना त्वचेसंबंधित समस्या उद्भवत असतील अशांनी हळदीच्या दुधाचे सेवन करू नये. हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे स्किन रॅशेस किंवा त्वचेवर जळजळ होऊ शकते. त्यामुळे हळदीचे दूध किंवा हळदीचे पदार्थ खाऊ नयेत.