पाठदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' उपाय ठरतील गुणकारी
बदलेली जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी शरीरात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. बऱ्याचदा एक जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यामुळे कंबर, पाठ आणि हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. या वेदना लवकर बऱ्या होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे सतत एकजागेवर बसून राहणे, तासनतास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत राहणे इत्यादी अनेक कारणांमुळे पाठीचे दुखणे वाढू लागते. या वेदना काहीवेळा औषधाने सुद्धा थांबत नाहीत. पाठ चमकल्यानंतर अनेक लोक पाठीवर पाय देतात किंवा बाम लावतात. मात्र यामुळे सुद्धा पाठ आणि कंबरेच्या वेदना बऱ्या होत नाही. वयाच्या तिशीमध्ये अनेकांना कंबर दुखी किंवा पाठ दुखीच्या वेदना जाणवू लागतात. या वेदनांपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतील.(फोटो सौजन्य – istock)
पाठ किंवा कंबरेच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्यावा. गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेतल्यामुळे वेदनांपासून आराम मिळतो आणि स्नायूंना आलेली सूज कमी होते. गरम पाण्याच्या पिशवीचा शेक कंबरदुखीच्या वेदनांवर अतिशय प्रभावी ठरतो. त्यामुळे रात्री झोपण्याआधी गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्यावा. हा उपाय दिवसभरातून २ किंवा ३ वेळा केल्यास आराम मिळण्यास मदत होईल. गरम पाण्याची थेरपी नियमित केल्यामुळे शरीरातील स्नायूंना आलेली सूज कमी होते.
हळद आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. हळदीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला आलेली सूज, वेदना आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून मिक्स करा. या दुधाचे नियमित सेवन केल्यास वेदनांपासून तात्काळ आराम मिळेल. हळदीमध्ये आयुर्वेदाक अॅन्टी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. यामुळे वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते.
5 रुपयांचा हा पदार्थ ठरेल सर्व आजारांवर रामबाण उपाय; सर्दी-खोकलाच काय तर डोकेदुखीही होईल दूर
कंबर किंवा पाठीचे दुखणे वाढल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध खातात. मात्र यासोबतच लसूण तेलाने मसाज केल्यास पाठीच्या वेदनांपासून आराम मिळेल. खोबऱ्याचे तेल मंद आचेवर गरम करून नंतर त्यात लसूण पाकळ्या टाकून ३ ते ४ तास तसेच ठेवून घ्या. तयार केलेले तेल पाठ आणि कंबरेच्या वेदनांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होईल आणि आराम मिळेल.