अॅसिडिटीमुळे पोटात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल 'हा' पदार्थ
दैनंदिन आहारात बऱ्याचदा चुकीच्या आणि अतितिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात पित्त वाढणे, अॅसिडिटी, अपचन, मळमळ , उलट्या होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. आहारात सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम दिसून येतो. यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीरास पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात पित्त वाढल्यानंतर मळमळ, त्वचेवर पुरळ उठणं, डोकेदुखी, चिडचिड आणि जळजळ, उलट्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात कोणत्याही पदार्थांचे सेवन करून नये. (फोटो सौजन्य – iStock)
5 रुपयांचा हा पदार्थ ठरेल सर्व आजारांवर रामबाण उपाय; सर्दी-खोकलाच काय तर डोकेदुखीही होईल दूर
बऱ्याचदा शरीरात तिन्ही दोष एकत्र झाल्यामुळे शारीरिक स्थिती असंतुलित होऊन जाते. त्यामुळे शरीराला अनेक विकार होऊ लागतात. शरीरात पित्ताची वाढ झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात, मात्र या गोळ्या औषधांचे वारंवार सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक मसाल्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या मसाल्यांच्या सेवनामुळे शरीराला तात्काळ आराम मिळेल.
सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी एक चमचा तूप खावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तुपाचे सेवन केल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेल्या घटकांमुळे आरोग्य सुधारते. याशिवाय तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहील. सकाळी उठल्यानंतर तूप खाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. तसेच जळजळ, असिडिटीची समस्या उद्भवणार नाही.
काहींना सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये चपाती खाण्याची सवय असते. त्यामुळे नुसतीच चपाती न खाता चपातीसोबत तूप खावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. साजूक तूप स्नायूंमधील स्निग्धता वाढवण्यासाठी मदत करते. याशिवाय खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. अनेक लोक तूप खाणे टाळतात, पण वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
Corona: वाढत्या करोनादरम्यान 5 मसाल्यांचे सेवन ठरेल रामबाण, Immunity होईल बुस्ट आजार होईल छुमंतर
दैनंदिन आहारात कोणताही पदार्थ वेळी अवेळी खाल्ला जातो. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात पित्त तयार होऊ लागते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात तुपाचे सेवन करावे. तुपाचे सेवन सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करावे, यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच नियमित योग्य वेळी, मोजून तूप खाल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते.