
किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे?
किडनी निरोगी ठेवण्यासाठी सोपे उपाय?
किडनी खराब किंवा निकामी होण्याची कारणे?
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी किडनीचे कार्य कायमच सक्रिय असणारे आवश्यक आहे. किडनी रक्त शुद्ध करण्यापासून ते अगदी शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. किडनी स्वच्छ झाल्यामुळे संपूर्ण आरोग्य कायमच निरोगी राहते. पण बऱ्याचदा शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम दिसून येतात. किडनीच्या आजारांचा थेट परिणाम त्वचा, डोळे, ऍलर्जी इत्यादी अनेक गोष्टींवर होतो. पण बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनीच्या आजारांची लागण झाल्यानंतर त्वचेवर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच वेळीच सावध होऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत, अन्यथा किडनी निकामी होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
चुकीच्या वेळी जेवणे, पाण्याची कमतरता, धु्म्रपान इत्यादी जीवनशैलीतील बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. वय वाढल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. तसेच शरीराचे कार्य मंदावते. पण कामाच्या धावपळीमध्ये शरीराची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. असे केल्यामुळे अनेक छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात. किडनीला कमी वेळामध्ये खूप जास्त काम करावे लागते, त्यामुळे किडनी निकामी होणे, किडनी कमकुवत होणे इत्यादी समस्या उद्भवतात.
Ans: लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा होण्यात बदल होणे
Ans: रक्तातील उच्च दाब मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकतो.
Ans: रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी.