किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
दैनंदिन आहारात किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. मात्र या बदलांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. शरीरातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे किडनी. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्यापासून ते अगदी पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. पण चुकीच्या सवयींमुळे किडनीचे कार्य बिघडते. किडनी खराब झाल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पण याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य आणखीनच बिघडू लागते. धावपळीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा नकारात्मक परिणाम किडनीसह आरोग्यावर सुद्धा दिसून येतो.(फोटो सौजन्य – iStock)
सांध्यांमध्ये अडकलेले Uric Acid कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन
किडनी खराब झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात शरीरामध्ये सामान्य लक्षणे दिसू लागतात. मात्र कालांतराने ही लक्षणे आणखीन गंभीर होतात, ज्यामुळे किडनीचे कार्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला किडनी खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. किडनीचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात सतत बदल होऊन इतरही लक्षणे दिसू लागतात. शरीरामध्ये ही लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
किडनीचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जात नाही, ज्याचा [परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध करण्यास अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे शरीरात पुरेशी ऊर्जा राहत नाही. किडनी खराब झाल्यामुळे सतत चक्कर येणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसू लागतात. दिवसभर झोपल्यानंतर सुद्धा थकल्यासारखे वाटू लागते.
लघवीच्या रंगात नेहमी नेहमी बदल दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घ्यावे. किडनीचे कार्य सुरळीत असल्यास लघवीचा रंग सौम्य पिवळसर असतो आणि सतत लघवीला जावे लागत नाही. मात्र किडनीचे कार्य बिघडल्यानंतर लघवीचा रंग गडद होतो, लघवी जास्त फेसाळलेली दिसू लागते. याशिवाय वारंवार लघवीला जावे लागते. ही लक्षणे किडनी खराब झाल्यानंतर दिसू लागतात.
किडनीचे कार्य बिघडल्यानंतर शरीरातील पाणी आणि क्षारांमध्ये असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे शरीरात अनावश्यक पाणी साचून राहते. यामुळे चेहरा, पाय, हात, टाच इत्यादी शरीराच्या अवयवांना सूज येऊ लागते. किडनी खराब झाल्यानंतर शरीराला आलेली सूज लवकर कमी होत नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करावे.
शरीरात वाढलेला आणि कमी झालेला रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. किडनी कमजोर किंवा निकामी झाल्यानंतर शरीराचा रक्तदाब अनियंत्रित होतो. वारंवार ही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी.