सोनिया गांधींना नक्की काय झालंय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या आजारामुळे गुरुवारी सकाळी ८:३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर गंगाराम रुग्णालयाच्या अहवालानुसार, त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे आणि त्यांची नियमित तपासणी केली जात आहे. असे म्हटले जात आहे की ६८ वर्षीय ज्येष्ठ नेत्याला आज कधीही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
TOI च्या अहवालानुसार, सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की सोनिया गांधींना पोटाचा काही त्रास होत होता. पण ही फारशी चिंतेची बाब नव्हती आणि आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आता गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. समीरन नंदी यांच्या देखरेखीखाली आहेत.
सोनिया गांधी कार्यरत
सोनिया गांधी शेवटच्या वेळी गेल्या आठवड्यात १३ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी सरकारला जनगणनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. सोनिया गांधी यांनी असा दावाही केला होता की देशातील किमान १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या मोफत अनुदानाच्या फायद्यांपासून वंचित आहेत.
Sonia Gandhi: काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची अचानक बिघडली तब्बेत, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
पोटाचे संसर्ग काय असतात?
पोटाचे संसर्ग ही एक सामान्य समस्या आहे जी बॅक्टेरिया, विषाणू किंवा Virus मुळे होऊ शकते. याला गॅस्ट्रोएन्टेरिटिस असेही म्हणतात. या संसर्गामुळे पोटदुखी, अतिसार, उलट्या आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात. योग्य वेळी उपचार न केल्यास ही स्थिती गंभीर होऊ शकते. काही व्यक्तींना या पोटाच्या संसर्गामुळे अधिक त्रास होतो आणि दुखणेही असह्य होते, अशावेळी डॉक्टरांच्या देखरेखीखाली अशा रूग्णांना रहावे लागते
पोटाच्या संसर्गाची कारणे
घाणेरडे किंवा संक्रमित अन्न खाल्ल्याने बॅक्टेरिया पोटात प्रवेश करतात. या संक्रमणासाठी ई. कोलाई, साल्मोनेला, शिगेला सारखे बॅक्टेरिया हे याचे कारण असू शकतात. व्हायरस जिआर्डियासारखे परजीवी दूषित पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात. तसंच घाणेरड्या हातांनी अन्न खाल्ल्याने किंवा दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग लवकर होऊ शकतो आणि ज्यांना आधापासून काही आजार आहेत, त्यांना अशा संसर्गांचा त्रास लवकर होतो.
संसर्गाची लक्षणे
पोटातील संसर्ग रोखण्याचे मार्ग
तुम्ही रोज स्वच्छ आणि ताजे अन्न खा. तसंच बाहेरील दूषित आणि रस्त्यावरील अन्न खाणे टाळा. साबणाने हात चांगले धुतल्यानंतरच जेवा. उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. कच्चे आणि कमी शिजलेले अन्न टाळा. दूषित दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नका. आपण रोज काय खात आहोत आणि आहारात काय समाविष्ट करून घेत आहोत याकडे बारकाईने लक्ष द्या. सहसा जंक फूड, प्रोसेस्ड फूड खाणे टाळा आणि खाताना स्वच्छ जागी बसा तसंच संपूर्ण स्वच्छता पाळा, ज्यामुळे संक्रमण होण्याची भीती राहत नाही