वेलचीचे पाणी कसे तयार करावे?
चुकीचा आहार, तणावपूर्ण जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, कामाचा तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात बिघाड झाल्यानंतर त्याचे परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. याशिवाय शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवात, सांधे दुखणे, हाडांचे दुखणे, सांधेदुखी, गाठी मूत्रविकार इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यानंतर अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
वेलचीच्या पाण्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहील. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आढळून येतात, जे शरीरातील विषारी पदार्थ लघवीवाटे बाहेर काढून टाकतात. शरीरात विषारी पदार्थ साचून राहिल्यामुळे आरोग्य बिघडते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलचीचे कशा प्रकारे सेवन करावे? वेलची खाल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात. याशिवाय बॉडी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. याशिवाय या पाण्याच्या सेवनामुळे लिव्हर आणि किडनीमध्ये साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात वेलचीच्या पाण्याने केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. तसेच यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून जातील.
युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवात, सांध्यांना सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. वेलचीचे पाणी सांध्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हाडांचे आरोग्य सुधारते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी वेळी वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यास हाडांसंबंधित समस्या कमी होऊन आराम मिळेल.
युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर प्रामुख्याने लघवीचे आजार किंवा किडनीच्या आजारांचा धोका वाढू लागतो. हे आजार वाढल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वेलचीच्या पाण्यात सॉमेटिक डाइयूरेटिक घटक आढळतात. त्यामुळे वेलचीच्या पाण्याचे जास्त सेवन केल्यामुळे लघवीवाटे शरीरातील सोडियम, पोटॅशियम बाहेर पडून जाते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवत नाही. मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे.
वेलचीचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, एक ग्लास पाण्यात रात्री २ वेलची टाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर वेलचीची साल काढून त्यातील दाण्याचे आणि पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारेल. वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.