मेंदूच्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात विषारी
दैनंदिन आहारात खाल्ले जाणारे सर्वच पदार्थ शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करतात. त्यामुळे रोजच्या आहारात कायमच हेल्दी आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. मानवी शरीरातील अतिशय गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू. मेंदू शरीरातील प्रत्येक कृती, विचार, भावना आणि निर्णय इत्यादींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. पण हल्ली चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येत आहे. चुकीचा आहार, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे मेंदूचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. यामुळे स्मृती कमी होणे, लक्ष विचलित होणे, निर्णय घेताना अडचणी निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात खाल्ले जाणारे कोणते पदार्थ मेंदूसाठी विषारी ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये थंड पेयांचे सेवन केले जाते. पॅकिंग फळांचा रस, कोल्ड्रिंक, कॉफी इत्यादी पेयांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. या पदार्थांमध्ये असलेल्या साखरेमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि मेंदूला सूज येते. याशिवाय नियमित कोल्ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्यामुळे अल्झायमर किंवा स्मृतीभ्रंशाचा धोका वाढून मेंदूचे आरोग्य बिघडून जाते. याशिवाय शरीरात थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आहारात लिंबू, काकडी किंवा पुदिनापासून बनवलेल्या डिटॉक्स पेयांचे किंवा ताज्या फळांच्या रसाचे सेवन करावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पॅकबंद स्नॅक्स खाण्याची सवय असते. चिप्स, कुरकुरे किंवा इतर तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरासोबतच मेंदूच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे स्मृती कमी होणे, मूड स्विंग्स आणि मानसिक आरोग्यात अनेक अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात ॲव्होकॅडो, ड्रायफ्रूट्स, ऑलिव्ह ऑईल, फळे, पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी
मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळे आणि हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या कार्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाही. याशिवाय व्यायाम किंवा ध्यान केल्यामुळे मानसिक आरोग्य बिघडत नाही. शरीराचा समतोल राखण्यासाठी आहारात खाल्ले जाणारे पदार्थ सुद्धा कारणीभूत ठरतात.
मेंदूचे आरोग्य कसे सुधारावे?
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबी असलेला आहार घ्या.रोज व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळतो.
मेंदूचे आरोग्य बिघडल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?
स्मृतीभ्रंश किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.सतत डोकेदुखी होणे.झोपेच्या समस्या, जसे की निद्रानाश.अचानक वर्तनामध्ये बदल होणे.