शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' हिरव्या पानांचे करा सेवन
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना सतत थकवा जाणवणे, पोटात जडपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे संपूर्ण दिवसाची सुरुवात अतिशय वाईट होते. पोट स्वच्छ न झाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोटात वेदना होणे, अपचन, गॅस किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला लहान मुलांसह मोठ्यांना छोट्या मोठ्या आजाराची लागण कायमच होत असते. कधी सर्दी, खोकला तर कधी पोटात दुखणे, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.पण बऱ्याचदा शरीरात दिसून येणारे अनेक छोटे आजार मोठे रूप धारण करतात. अपचन झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण वारंवार गोळ्या औषध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराचे वाढलेले वजन बऱ्याचदा अनेक गंभीर आजारांचे कारण ठरते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात हेल्दी आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पानाचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. उपाशी पोटी खाल्ली हिरवी पाने अनेक गंभीर आजारांवर प्रभावी ठरतात.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन करावे. शरीरात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे वारंवार ऍसिडिटी किंवा अपचन होते. ज्यामुळे कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. पचनक्रिया सुधारण्यासाठी तुळशीच्या पानांचे उकळलेले पाणी प्यावे. यामध्ये असलेले जीवाणूनाशक व दाहशामक गुणधर्म पोटातील जंतूंना मारून टाकतात. नियमित तुळशीची दोन पाने खाल्यास शरीराची पचनक्रिया सुधारते.
बदलत्या ऋतूनुसार शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये अनेक बदल होतात. वारंवार सर्दी, खोकला किंवा शरीराला साथीच्या आजारांची लागण होते. अशावेळी नियमित तुळशीचा काढा बनवून प्यावा. तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व सी आणि झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. उपाशी पोटी नियमित तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स वाढणार नाहीत.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुळशीच्या पानांचे पाणी प्यावे. यासाठी टोपात पाणी गरम करून ७ ते ८ तुळशीची पाने टाकून उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी थंड करून उपाशी पोटी सेवन करा. यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. ताण, चिंता किंवा थकवा दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन करावे.
तुळशीचा वापर कसा केला जातो?
तुळस विविध पदार्थांमध्ये चव आणि सुगंधासाठी वापरली जाते. ही एक औषधी वनस्पती आहे, म्हणजेच ती अन्नात वापरली जाते.
तुळशीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?
तुळशीचे औषधी गुणधर्म शतकानुशतके वापरले जात आहेत, परंतु ते स्वयंपाकासाठी उपयुक्त औषधी वनस्पती म्हणून अधिक ओळखले जाते.
तुळशी म्हणजे काय?
तुळस, ज्याला ग्रेट बेसिल असेही म्हणतात, ही पुदिना कुटुंबातील (लॅमियासी) एक औषधी वनस्पती आहे जी जगभरातील विविध पाककृतींमध्ये स्वयंपाकासाठी वापरली जाते.