Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात डेंग्यूची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून घ्या शरीराची काळजी

डेंग्यू झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या डेंग्यू झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 05, 2025 | 05:30 AM
पावसाळ्यात डेंग्यूची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे

पावसाळ्यात डेंग्यूची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे

Follow Us
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. वातावरण कधी थंड असते, तर कधी वातावरणात आद्र्रता निर्माण होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. देशभरात साथीच्या आजारांची रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या दिवसांमध्ये सतत सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब इत्यादी आजार वाढू लागतात. हे आजार वाढल्यानंतर अजुआबाजूच्या परिसरातील लोकांनासुद्धा साथीच्या आजाराची लागण होते. शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागल्यांस तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(फोटो सौजन्य – iStock)

किडनीला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच व्हा सावध होऊन घ्या काळजी

सतत बाहेरचे तेलकट किंवा उघड्यावरचे पदार्थ खाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांची पैसाद मोठ्या प्रमाणावर होते. डेंग्यू झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. शरीरातील पांढऱ्या पेशी डेंग्यू झाल्यानंतर कमी होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? आजारापासून बचाव करण्यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

डेंग्यू झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

  • थंडी ताप
  • उलट्या होणे
  • जुलाब
  • शरीरात थकवा अशक्तपणा वाढणे
  • सर्दी

संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी सोपे उपाय:

आजूबाजूला पाणी साचू देऊ नका:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया किंवा कावीळ इत्यादी आजारांची लागण होण्याची शक्यता असते. हे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये म्हणून कुठेही पाणी साचून देऊ नका. कुलर, बादली, फुलपात्रे, जुने टायर इत्यादी ठिकाणी पाणी साचू देऊ नका. याशिवाय घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

अंगभर कपडे घालणे:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मच्छर चावू नये म्हणून पूर्ण अंगभर कपडे घालावे. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी लांब आणि अंगभर कपडे घालावेत. कारण संध्याकाळच्या वेळी जास्त मच्छर येतात. डास चावू नये म्हणून दरवाजा, खिडक्यांवर जाळ्या लावून ठेवाव्यात. यामुळे मच्छर घरात येणार नाही.

लिव्हरसाठी दारूचं नाहीतर ‘हे’ पदार्थ सुद्धा ठरतात अतिशय भयानक, शरीरात दिसून येतील गंभीर बदल

रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे:

निरोगी आरोग्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये आहारात हेल्दी आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आजारात भाज्या, फळे, ड्रायफ्रूट इत्यादीचे सेवन करावे. यासोबतच शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप घ्यावी. यामुळे तुम्ही कायम फ्रेश आणि निरोगी राहाल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These symptoms appear in the body after dengue infection during rainy season monsoon health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy life
  • monsoon care

संबंधित बातम्या

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं
1

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं

Health Tips: लो बीपीमुळे त्रस्त आहात? आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
2

Health Tips: लो बीपीमुळे त्रस्त आहात? आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा ‘या’ पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम
3

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा ‘या’ पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे
4

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.