किडनीला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवय म्हणजे किडनी. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. याशिवाय रक्त शुद्ध करण्याचे काम देखील किडनी करते. शरीर कायम निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील सर्वच अवयवांचे कार्य सुरळीत असणे आवश्यक आहे. पण बदलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडून जाते. किडनीमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे रक्त फिल्टर करण्याचे प्रक्रियामध्ये अडथळे निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला किडनीला सूज आल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.(फोटो सौजन्य – iStock)
वारंवार पोटात दुखत? पावसाळ्यात उद्भवू शकते कावीळची समस्या, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
किडनीला सूज आल्यानंतर सकाळी उठल्यावर रात्रीपेक्षा जास्त थंडी वाजू लागते. ही समस्या कोणत्याही सीझनमध्ये उद्भवू शकते. सकाळी उठल्यानंतर वारंवार तुम्हाला जर थंडी वाजत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
किडनीचे कार्य बिघडल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारी लक्षणे म्हणजे लघवीतून फेस येणे. लघवीतून फेसच नाही तर लघवीचा रंग सुद्धा गडद होऊन जातो. याशिवाय किडनी खराब झाल्यानंतर किंवा किडनीला सूज आल्यानंतर लघवी फार कमी होते किंवा पुन्हा पुन्हा जावे लागते. शरीरसंबंधित दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. अन्यथा किडनी खराब होईल.
किडनी खराब झाल्यानंतर हात, पाय किंवा शरीराच्या इतर अवयवांना सूज येऊ लागते. शरीराला सूज आल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र असे केल्यास शरीराला आणखीनच हानी पोहचू शकते. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर सगळ्यात आधी दिसून येणारे लक्षण म्हणजे शरीराला आलेली सूज. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोणत्याही कारणाशिवाय शरीराला खाज येत असेल तर किडनी खराब झाल्याचे संकेत असू शकतात. किडनी खराब झाल्यानंतर अंगाला सतत खाज येऊ लागते. तसेच किडनी स्टोन किंवा शरीराशी संबंधित एखाद्या दुसऱ्याचे संकेत सुद्धा असू शकतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे.